Friday, November 8, 2024

काँग्रेसने रिपब्लिकन पक्ष संपवला

Share

भारताच्या स्वातंत्र्यानंतर अनुसूचित जातीच्या समाज प्रवर्गाला एकत्र करत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिपब्लिकन पक्षाने राजकीय क्षेत्रात कामाला सुरुवात केली. अनुसूचित जाती प्रवर्गातील समाजाला रिपब्लिकन पक्षापासून तोडण्याचे पाप काँग्रेसने केले. रिपब्लिकन पक्षाचे प्रतिनिधी म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना भारताच्या पहिल्या केंद्रीय मंत्रिमंडळात कायदा व कामगार मंत्री म्हणून काँग्रेसने स्थान दिले, परंतु त्यांची कायमच काँग्रेसने अवहेलना केल्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी वैचारिक मतभेदातून राजीनामा दिला.

रिपब्लिकन पक्षाला सत्तेत बरोबर घेत त्यांना योग्य प्रतिनिधित्व द्यायचे सोडून काँग्रेसने रिपब्लिकन पक्षाला संपविण्यासाठी अनुसूचित जाती प्रवर्गाला भ्रमित केले व खोटी – नाटी आश्वासने देऊन आपलेसे केले.परंतु समाजाच्या गरजांचा विचार न करता केवळ सत्तेसाठी या प्रवर्गाचा उपयोग केला.

परंतु डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर *रिपब्लिकन पक्षाला केंद्रीय मंत्रिमंडळात श्री.रामदास आठवले यांच्या रूपाने जवळपास ५८ वर्षानंतर श्री.नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाने संधी दिली* व श्री.रामदास आठवले व रिपब्लिकन पार्टीचा कायमच सन्मान केला – मान राखला. अनुसूचित जातीमधील प्रवर्गासाठी केंद्र सरकारने व राज्यातील महायुतीच्या सरकारने अनेक योजना राबविल्या.

अनुसूचित जाती प्रवर्गातील लोकांचे जीवनमान सुधारले, त्यामुळेच आपल्या पक्षाला व आपल्याला संपविणाऱ्या काँग्रेसचे पितळ उघडे पडले आहे. आज अनुसूचित जाती प्रवर्गातील समाजाने आपला कैवारी कोण आहे हे आता पुरते ओळखले आहे, या समाजात याबाबतची जागृती झाली आहे.

अन्य लेख

संबंधित लेख