Monday, December 2, 2024

बडनेरा-नाशिक रेल्वेला कजगाव येथे थांबा देण्याची मागणी

Share

कजगाव, ता. भडगाव : कजगावपासून ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या कनाशी येथील तीर्थ क्षेत्र सर्वज्ञ श्री.चक्रधर स्वामींचे मोठे स्थान आहे. येथे देशभरातून भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत असतात. याठिकाणी भाविकांची नेहमी वर्दळ असते. येणाऱ्या भाविकांच्या सोयीच्या दृष्टीने बडनेरा-नाशिक या रेल्वेला कजगाव स्टेशनवर थांबा मिळावा यासाठी भाजपा उत्तर महाराष्ट्र वैद्यकीय आघाडीचे उपाध्यक्ष डॉ.नीलकंठ पाटील यांनी जळगाव जिल्याच्या खासदार स्मिता वाघ यांच्याकडे केली आहे.

चैत्र पौर्णिमा यात्रोत्सव, दाढ विशेषसह वर्षभर चालणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमाला देशभरातून लाखो भाविक या ठिकाणी येतात. कजगाव, नगरदेवळा ही मोठ्या लोकसंख्येची गावे आहेत. तसेच ५० खेडे लागून आहेत. एकूणच बडनेरा नाशिकरोड ०१२११ व नाशिकरोड बडनेरा ०१२१२ ही रेल्वे गाडीला कजगाव येथे थांबा मिळावा असं निवेदन डॉ. नीलकंठ पाटील यांनी दिले. यावेळी जिल्हा महानुभाव परिषदेचे अध्यक्ष येळमकर बाबाजी शास्त्री, सतीश पाटील शिंदाड, ज्ञानेश्वर पाटील निंबोरी, स्वप्निल पाटील बालाड,तसेच कजगाव येथील गोपाल पुजारी आदी यावेळी उपस्थित होते.

अन्य लेख

संबंधित लेख