Friday, October 18, 2024

गुन्हेगारांना थारा नाही…

Share

गुन्हेगारांना थारा नाही…

गुन्हेगारांना थारा नाही…महायुती(Mahayuti) सरकारच्या कार्यकाळांत कुठलीही घटना घटल्यानंतर तात्काळ कारवाई करण्यात आली आहे. गुन्हेगारांना जरब बसेल अशा सुचना देण्यात आल्या होत्या. अस्थिरता निर्माण करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात आली. असेही भाजपाचे रिपोर्ट कार्ड सादर करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांनी सांगितले.

”वेगवेगळ्या समाजांचे महामंडळ स्थापन करून लक्षित घटक म्हणून त्यांच्याकडे कसं  लक्ष देता येईल हा प्रयत्न महायुती सरकारने केला.” देवेंद्रजींनी सांगितलं.

पायाभूत सुविधा क्षेत्रातही महायुतीने केलेले काम अतिशय अभूतपुर्व आहे. मुंबई, एमएमआर क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत. वाढवण बंदर देशाची आणि राज्याची अर्थव्यवस्था बदलण्याची ताकद आहे.असेही ते म्हणाले.

https://x.com/i/status/1846487498395943393

सिंचनक्षेत्रात अभूतपूर्व काम करत महायुती सरकारने सत्तेत आल्यानंतर 145 प्रकल्पांना मान्यता दिली. 22 लाख 73 हजार हेक्टर सिंचनक्षमता निर्माण केली आहे. मागेल त्याला सौरपंप योजनेमुळे फक्त 10 टक्के पैसे भरून शेतक-यांना सौरपंप मिळाल्याने 25 वर्षे वीजबिल येणार नाही. वैनगंगा-मळगंगा, नार-पार-गिरणा, दमणगंगा-पिंजाळ, दमणगंगा-एकदरे असे 4 नदीजोड प्रकल्प मंजूर करण्यात आले. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून एक लाखांच्यावर मराठा उद्योजकांना बळ मिळाले आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.

अन्य लेख

संबंधित लेख