Wednesday, January 29, 2025

धाराशिवच्या सुनंदाबाई गोरे यांच्यासाठी आधार ठरली लाडकी बहीण योजना

Share

ग्रामीण भागातील मुख्य व्यवसाय हा शेती आहे. शेतीवर अवलंबून राहून मजूरी करणारा मोठा वर्ग
ग्रामीण भागातच राहतो. निसर्गावर अवलंबून राहूनच जिल्ह्यातील बहुतांश शेती केली जाते.निसर्ग हा
शेतीला नेहमीच साथ देईलच असे कधी होत नाही. त्यामुळे अल्पभूधारक असलेले शेतकरी व त्यांचे
कुटुंब आपली शेती करून दुसऱ्यांच्या शेतीवर किंवा इतरत्र मजुरीला जातात. अशाच एका अल्पभूधारक
विधवा शेतकरी महिलेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही तिच्या कुटुंबासाठी आधार ठरली
आहे. धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील बेंडकाळ गावच्या सुनंदाबाई गोरे या त्यापैकीच एक
आहेत.

अल्पभूधारक असलेल्या विधवा शेतकरी सुनंदाबाई गोरे यांना अंगणवाडी सेविका आशा जाधव यांनी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेविषयी माहिती देऊन आपण या योजनेसाठी पात्र ठरत
असल्याचे सांगितले.अंगणवाडी सेविका श्रीमती जाधव यांनी माहिती दिल्यानंतर सुनंदाबाईंनी आवश्यक
त्या कागदपत्रांसह अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून नारीदूत अँपवर ऑनलाईन अर्ज केला.योजनेच्या
लाभासाठी सुनंदाबाईचा अर्ज जुलै महिन्यात पात्र ठरला आणि 15 ऑगस्टला त्यांच्या आधार संलग्न
बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याची या योजनेची रक्कम सुनंदाबाईच्या बँक खात्यात जमा
झाली.

चार वर्षापूर्वी सुनंदाबाई गोरे यांच्या पतीचे निधन झाले.घरी अत्यल्प तीन एकर शेती. एक विवाहीत
मुलगा, घरची शेतीची कामे करून दुसऱ्याच्या शेतात मजुरीला मुलगा, सून आणि सुनंदाबाई
जातात.आता प्रकृती बरी राहत नसल्याने जास्त शेतीची कामे होत नाही.वारंवार आजारी पडत
असल्याने सुनंदाबाईचा दवाखान्याचा खर्चही वाढला. घर संसार सांभाळणाऱ्या मुलावरच आर्थिक ताण
पडायचा.पतीच्या निधनानंतर मुलगाच देखभाल करत असल्यामुळे त्याच्याकडे सुनंदाबाई कष्टाचा पैसा
जमा करु लागल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करून आमच्यासारख्या
गरीब महिलांच्या जीवनात आनंद पेरल्याची भावना सुनंदाबाईने व्यक्त केली. गरीब महिलांच्या बँक
खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा होणार असल्याने या महिलांना हा पैसा आता घरचा
किराणा, मुलांचे कपडे, दवाखाना व घरच्या इतर खर्चाला सुद्धा हा कामी येणार आहे.अनेक घरातील
कर्त्या पुरुषाला देखील या पैशाची मदत होणार आहे.

अन्य लेख

संबंधित लेख