Tuesday, September 17, 2024

आदिशक्तीला देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान स्त्रीशक्तीचे नमन… राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर

Share

कोल्हापूरमध्ये मा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी श्रीअंबाबाईचे आज दर्शन घेतले. यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी यावेळी उपस्थित होते. कोल्हापूर विमानतळावर राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राष्ट्रपतींचे स्वागत केले.

राष्ट्रपती २१ व्या दीक्षान्त समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. तसेच मुंबई येथे महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमात सहभागी होतील.

बुधवार ४ सप्टेंबर रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते उदगीर, लातूर येथील बुद्ध विहाराचे उद्घाटन होणार आहे. उदगीर येथे महाराष्ट्र शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ आणि ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थ्यांच्या मेळाव्यालाही त्या मार्गदर्शन करणार आहेत. श्री वारणा महिला सहकारी विविध उद्योग समुहाचा सुवर्ण सोहळा आणि वारणा विद्यापीठाचा उद्घाटन समारंभ निमित्ताने वारणा नगर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास भारताच्या राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार आहेत.

मंगळवार ३ सप्टेंबर रोजी पुणे येथे सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या (डीम्ड युनिव्हर्सिटी) २१ व्या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच मुंबई येथे महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमात सहभागी होतील.

अन्य लेख

संबंधित लेख