Tuesday, March 25, 2025

एकनाथ शिंदेची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद; काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष

Share

मुंबई : महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज दुपारी ३ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधणार आहेत. सध्या राज्यातील पुढील सरकारच्या नेतृत्वाबाबत भाजप आणि मित्रपक्षांमध्ये सुरू असलेल्या चर्चेमुळे या पत्रकार परिषदेबाबत प्रचंड उत्सुकता आहे. मुख्यमंत्रीपदासाठी भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. दुसरीकडे, शिंदे गटाचे नेते पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, अशी त्यांची स्पष्ट इच्छा व्यक्त करत आहेत. त्यामुळे, या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे नेमकं काय वक्तव्य करणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख