Wednesday, April 2, 2025

AI : गुगल भारतात करणार एआयमध्ये गुंतवणूक

Share

यासंदर्भात सुंदर पिचाई म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीनी भारताचा कायापालट करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. डिजिटल इंडिया बरोबरच कृषी आणि भारताच्या पायाभूत सुविधांचादेखील यामध्ये विचार केला जात आहे. गुगुल भारतामध्ये एआय (AI) क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत असून भारतात पिक्सेल फोनदेखील बनवले
जाणार आहेत. कृत्रिम बुद्धीमत्तेतील(AI) बाजारपेठेचा फायदा भारतीय जनतेसाठी मोठा असून याचा वापर भारतातील लोकांच्या सेवेसाठी असला पाहिजे असा पंतप्रधान मोदी यांचा हेतू आहे. मोदी हा दृष्‍टीकोन आम्‍हाला एआय क्षेत्रात अधिक काम करण्‍यासाठी प्रोत्‍साहन देत असल्‍याचेही सुंदर पिचाई यांनी सांगितले.

जगातील बलाढ्य कंपनी असलेली गुगल भारतात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता  क्षेत्रात गुंतवणूक करणार असल्याची माहिती गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी दिली. अमेरिका दौर्‍यावर असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टेक कंपन्यांच्या प्रमुख सीईओंबरोबर घेतलेल्‍या बैठकीनंतर पिचाई बोलत होते.

अन्य लेख

संबंधित लेख