Friday, September 20, 2024

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी घेतले साईबाबा समाधीचे दर्शन; राष्ट्राच्या कल्याणासाठी केली प्रार्थना

Share

शिर्डी : राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन (Governor C. P. Radhakrishnan) यांनी आज शिर्डी (Shirdi) येथे श्री साईबाबा समाधी मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. त्यानंतर त्यांच्या हस्ते पूजा व आरती करण्यात आली. राज्याच्या आणि राष्ट्राच्या 140 कोटी जनतेच्या कल्याणासाठी आणि समृद्धीसाठी यावेळी यांनी प्रार्थना केली. यावेळी राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, पोलीस अधीक्षक राकेश ओला, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर उपस्थित होते.

तत्पूर्वी, लोणी, अहमदनगर येथील प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या अभिमत विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी राज्यपाल सी.पी. राधाकृष्ण यांचे शिर्डी विमानतळावर आगमन झाले. पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी जिल्ह्याच्यावतीने त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर आदी उपस्थित होते.

दरम्यान, राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी द्वारकामाई व गुरस्थान मंदीराचेही दर्शन घेतले. साईबाबा संस्थानच्यावतीने श्री साईबाबांची मूर्ती देऊन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचे स्वागत करण्यात आले.

अन्य लेख

संबंधित लेख