Thursday, October 10, 2024

कोलकाता डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Share

कोलकाता इथल्या आर.जी.कर सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील कनिष्ठ डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती डॉक्टर धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठानं 30 सप्टेंबर रोजी या खटल्याची पुन्हा सुनावणी सुरू करणार असल्याचं जाहीर केलं होतं. गेल्या आठवड्यात न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचा समावेश असलेल्या खंडपीठानं पश्चिम बंगाल सरकारच्या विनंतीवर 27 सप्टेंबर रोजी होणारी सुनावणी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. यापूर्वी महिला डॉक्टरांना रात्री कामावर ठेवू नये अशा आशयाच्या राज्य सरकारच्या आदेशाकडे लक्ष वेधल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे.

अन्य लेख

संबंधित लेख