Saturday, March 28, 2026

पुण्यात हिंदुत्वासाठी कार्य करणाऱ्या शिलेदारांचा ‘हिंदु शौर्य’ पुरस्काराने गौरव

Share

पुणे : धनकवडी भागात ‘श्री रामनवमी उत्सव समिती, पुणे’च्या वतीने आयोजित ‘शोभायात्रा रामराज्याची’ आणि ‘हिंदु शौर्य पुरस्कार’ वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या महोत्सवाचे यंदा १३ वे वर्ष असून, यानिमित्ताने हिंदुत्वाच्या रक्षणार्थ अहोरात्र कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला.

यंदाचा ‘हिंदु शौर्य पुरस्कार’ खालील मान्यवरांना प्रदान करण्यात आला.

अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर: (राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद) – निरपराध हिंदूंना न्यायालयात न्याय मिळवून देण्यासाठी.

पांडुरंग बलकवडे: (ज्येष्ठ इतिहास संशोधक) – हिंदवी स्वराज्याच्या इतिहासातील योगदानासाठी.

संजय भोसले: (संचालक, अन्नामृत फाऊंडेशन) – सामाजिक आणि गोसेवा कार्यासाठी.

समीर गायकवाड: (अध्यक्ष, शनिपार मित्रमंडळ)

नितीन महाजन: (संस्थापक, केशव शंखनाद पथक)

यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

पुरस्काराला उत्तर देताना अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर म्हणाले की, “रामराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी न्यायालयात हिंदूंच्या बाजूने लढणे हे आमचे कर्तव्य आहे. आझाद मैदानात महिला पोलिसांवर झालेल्या आक्रमणाच्या जखमा आम्ही विसरलेलो नाही, त्यांनाही न्याय मिळालाच पाहिजे.”

गुलाबनगर ते धनकवडी बस स्टॉप दरम्यान निघालेल्या या शोभायात्रेत ‘श्री रामपंचायतन रथ’ आणि ‘श्रीरामाची पालखी’ भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र होती. रुद्र गर्जना ढोल-ताशा पथक, केशव शंखनाद आणि अमर ब्रँड पथकाच्या गजरात ही यात्रा निघाली. १०० ढोल-ताशांचे एकत्रित वादन, रांगोळ्यांच्या पायघड्या, कोल्ड फायर शो आणि फटाक्यांच्या आतषबाजीने धनकवडी परिसर राममय झाला होता. याप्रसंगी हजारो रामभक्त आणि हिंदुत्वनिष्ठ नागरिक उपस्थित होते.

अन्य लेख

संबंधित लेख