Thursday, August 14, 2025

स्वातंत्र्यदिनी होणारे पंतप्रधानांचे भाषण जनतेच्या मनातील गोष्टींचे प्रतिबिंब असेल!

Share

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सर्व नागरिकांना 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून होणाऱ्या भाषणाच्या संदर्भात त्यांचे विचार आणि संकल्पना मांडण्याचे आवाहन केले आहे.

आपल्या एक्स पोस्टवरील संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने, मी माझ्या भारतीयांच्या संकल्पना जाणून घेण्यास उत्सुक आहे!

यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात आपणास कोणते विषय किंवा संकल्पना प्रतिबिंबित झालेल्या आवडतील यासाठी नागरिकांनी MyGov आणि NaMo App वरील खुल्या मंचावर आपले विचार व्यक्त करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

अधिक माहिती साठी https://www.mygov.in/group-issue/let-your-ideas-and-suggestions-be-part-pm-modis-independence-day-speech-2025/ या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या.

अन्य लेख

संबंधित लेख