Friday, September 13, 2024

भारत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर: म्हणून देशाला हवे आहेत पुन्हा नरेंद्र मोदी

Share

भारताची महाशक्तीकडे वाटचाल होत आहे. सर्व प्रकारच्या शस्त्रास्त्रांना अत्याधुनिक आणि अद्ययावत स्वदेशी तंत्रज्ञानाची जोड देऊन सशस्त्रसेना मजबूत करण्यात आल्या आहेत. त्याचे लष्करी धोरणात्मक व सामरिक महत्त्व लक्षात घेऊन भारत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होत आहे.

भारताची महाशक्तीकडे होत असलेली वाटचाल प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ही वाटचाल होत आहे. त्यांच्या कणखर भूमिकेमुळेच भारताची महाशक्तीकडे वाटचाल सुरू असल्याचे म्हणता येईल.

बुद्ध‌पोर्णिमा, ११ मे १९९८ ला भारताने तीन यशस्वी अणुचाचण्या केल्या आणि १३ मेे १९९८ ला राहिलेल्या दोन यशस्वी अणुचाचण्या केल्या. त्यामुळे भारत १९९८ मध्येच अण्वस्त्रधारी देशांच्या पंक्तीत जाऊन बसला. अणु बॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब यासाठीचे परमाणु विखंडन तंत्रज्ञान (Nuclear Fission Technology) आणि परमाणु संलयन तंत्रज्ञान (Nuclear fusion Technology) भारताने विकसित केल्याचे प्रत्यक्ष अणुबॉम्ब चाचण्या घेऊन सिद्ध केलेच आणि कमी शक्तीचे अणुबॉम्ब जे रॉकेटद्वारा, तोफांद्वारा अथवा विमानांद्वारा डागता येतात असेही अणुबॉम्ब ज्याला Sub- kiloton या वर्गात गणले जाते ते यशस्वी झाले.

मार्च २०२४ या महिन्यात भारताने आणखी एक पराक्रम केला. एकाचवेळी ३ ते ८ अणुबॉम्ब एका ICBM अग्नी-५ द्वारे जे लांब पल्ला गाठून, हवेतच विलग करू शकतील आणि त्यातील प्रत्येक बॉम्ब स्वयंपूर्णरीतीने आपले लक्ष्य गाठून शत्रूची ठाणी स्वतंत्रपणे लक्ष्यभेद करेल अशी क्षमता असणारे (MIRV = Multiple Independently Targetable Re-entry Vehicle) तंत्रज्ञान विकसित करून त्याची यशस्वी चाचणी घेतली. त्या मोहिमेला “दिव्यास्त्र” हे नाव देण्यात आले होते.

म्हणजेच भारताकडे सर्व प्रकारचे अणुबॉम्ब आहेत व ते आंतर्खण्डीय क्षेपणास्त्र प्रणाली अग्नि-५ द्वारा किमान ५५०० कि.मी. पेक्षा जास्त पल्ला असणाऱ्या शत्रूलक्ष्यावर अचूक मारा करू शकतात. असे तंत्रज्ञान म्हणजे अणुबॉम्बचा मारा करणारी यंत्रणा एकाच वेळी कमाल १५०० कि.मी. अंतर असणारी शत्रू ठाणी लक्ष्य करून अणुबॉम्ब टाकता येतात. यामुळे भारत सशक्त व समर्थ असण्यामध्ये आणखी भर पडली आणि ते अधोरेखित झाले. भारत त्यामुळेच महाशक्तीकडे वाटचाल करीत आहे. नुसते श्रीमद् भगवत् गीते सारखे श्रेष्ठ तत्त्वज्ञान असून चालत नाही तर मजबूत देश त्या तत्वज्ञाना पाठीशी उभा रहावा लागतो, तर देशाबाहेर मान्यता मिळते. डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे बरोबर काम करण्याची संधी मिळाली. ते नेहमी म्हणत “Unless India Stands up to the world, no one will respect us. In this world fear has no place. Only Strength respects Strength.” आणि डॉ. कलामांच्या याच पाथेयावर सध्याचे सरकार जोमाने झेपावते आहे.

सर्व प्रकारच्या शस्त्रास्त्रांना अत्याधुनिक व अद्ययावत स्वदेशी तंत्रज्ञानाची जोड देऊन सशस्त्रसेना मजबूत करण्यात आल्या आहेत. त्याचे लष्करी धोरणात्मक व सामरिक महत्त्व लक्षात घेऊन भारत संरक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आत्मनिर्भर होत आहे आणि शस्त्रास्त्रां बरोबरच सामरिक सुविधा, जसे जलद हालचालीसाठीचे रस्ते, रेल्वेमार्ग, बोगदे, विमानतळ, जलमार्ग त्याच बरोबर दवणवळण सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिल्या आहेत. सशस्त्र दलांची विषेश काळजी घेऊन त्यांचे मनोबलही वाढवण्याचे कार्य प्रत्येक दिवाळी जवानां समावेत साजरी करून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आपल्या सेनांच्या मागे पूर्ण देश उभा आहे अशी खात्रीच दिली आहे.

स्वदेशी शस्त्रास्त्रे मग “अर्जुन” रणगाडा असू दे की “तेजस” लढाऊ विमान, स्वतः मोदीजींनी त्यातून उड्‌डाण केले व भारतीय शस्त्रास्त्रांबद्दलची विश्वासार्हता जगाला दाखवून दिली आहे, त्यामुळेच आज आपले पंतप्रधान ठामपणे म्हणतात “हम (भारत) न आँख झुकाकर बात करेंगे। न हम (भारत) आँख दिखाकर बात करेंगे। क्यों की “जीओ और जीने दो” ये हमारी संस्कृति है। “हम आँख से आँख मिलाकर बात करेंगे।” आणि अगदी तशीच वस्तुस्थिती आपण गेल्या दहा वर्षात अनुभवली आहे. अशा अनुकूल स्थितीतून भारत पुनश्च विश्वगुरु व्हायचा असेल तर नरेंद्र मोदीजीच परत पंतप्रधान हवे आहेत. अन्यथा विसरा सर्व… अशी पश्चात्ताप करण्याची वेळ येऊन काय उपयोग ? म्हणून स्थिर सरकार हवे. मोदी सरकार हवे.

काशीनाथ देवधऱ
(लेखक डीआरडीओचे वरिष्ठ शास्त्रज्ञ असून समूह संचालक म्हणून निवृत्त झाले आहेत. शस्त्रास्त्रे संशोधन आणि विकास या क्षेत्रातील चार दशकांचा अनुभव त्यांना आहे.)

अन्य लेख

संबंधित लेख