Saturday, November 23, 2024

भारतीय सेना म्हणजेच इंडियन आर्मी मधील अमुलाग्र बदल

Share

आपण सर्वजण जाणतो आहोत की या सध्याच्या आधुनिकीकरण आणि इंटरनेटच्या जमान्यात सर्व गोष्टी या आधुनिक होत आहेत, मग आपली इंडियन आर्मी मागे कशी राहील ?

मागच्या पंधरा ते वीस वर्षात आपल्या भारतीय सेनेचे आधुनिकीकरण खूप मोठ्या प्रमाणात झाले आहे .
मग ते हत्यारांबाबत असेल किंवा तिथे मिळणाऱ्या सोयी सुविधा याबरोबरच त्यांचं वेतन, या सर्व गोष्टी मध्ये
खूप मोठा अमुलाग्र बदल झाला आहे .अतिशय खडतर इंडियन आर्मीच्या ज्या पोस्ट आहेत जसे की लेह लडाख, हाय अल्टिट्यूड ग्लेशियर किंवा नॉर्थ ईस्ट अशा ठिकाणी आपल्या जवानांना आपल्या भूमीचं रक्षण करावं लागत होतं त्या ठिकाणी आता सुविधा उपलब्ध झालेले आहेत. त्यांना मिळणारे गरम कपडे, शूज, बर्फापासून बचाव करणारी उपकरणे, चांगल्या प्रकारचे रेशन, ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी, या सगळ्या गोष्टीमुळे सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांना बळ मिळतं, त्याबरोबरच जेव्हा हे आपले जवान सीमा रक्षण करतात व आपण आपल्या घरी शांतपणे झोप घेतो त्यावेळेस त्यांच्या फॅमिलींना सुद्धा सुख सोयी, सुविधा खूप चांगल्या प्रकारे सध्या उपलब्ध झालेल्या आहेत.

भारतीय सेना नेहमीच आपल्या स्थल, वायु आणि नौदल या तिन्ही दलातील आधुनिकीकरण होण्यासाठी सतत
प्रयत्नशील असते.

युद्ध क्षेत्रात लढण्यासाठी स्थल सेनेला आधुनिक आर्टिलरी गन्स, वजनाने आणि आकाराने हलकी असणारी ज्याचे वजन उचलून चालणे जवानांना सोपे जातील. अशी आधुनिक शस्त्रास्त्रे घेत आहे. नौसेना पाणबुडीच्या आधुनिकीकरणावर भर देत आहे.

वायु सेना भारतीय बनावटीची लढाऊ विमान बनवण्यासाठी भर देत आहे .तसेच सगळ्या प्रकारची मिसाईल शोधण्यासाठी वापरण्यात येणारी सक्षम थर्मल इमेजिंग प्रणाली रात्रीच्या काळोखात ही उत्तम काम करू शकते.
सुरुंग शोधून नष्ट करणारी आधुनिक यंत्र,हँलिकॉप्टर शूट करून पाडणारी एडव्हान्सड एयर गन, आटोमॅटिक टार्गेट ट्रेकिंग, त्याच प्रमाणे रडार, तोफखाना, रणगाडे यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी वापरली जात आहे.

आता आपण सगळे जाणतच आहोत की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, नैनो टेक्नोलाँजी या सगळ्या गोष्टींमुळे आपली भारतीय सेना सशक्त झाली आहे. कुठल्याही शत्रूचा योग्य प्रकारे प्रतिकार करण्याचे त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे, आपल्या देशाचे, आपल्या मातृभूमीचे रक्षण करण्याची जी जबाबदारी इंडियन आर्मी, भारतीय सीमेवर आहे ते खूप चोखपणे, चांगल्या प्रकारे निभावू शकतात मागच्या दहा वर्षांमध्ये आपल्या सैन्याला जवानांना वैद्यकीय सेवा खूप चांगल्या प्रकारे उपलब्ध झाली आहे, अतिशय दुर्गम अशा भागांमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारची वैद्यकीय सेवा त्यांना मिळते.

ग्लेशियर सारख्या ठिकाणी सुद्धा आता आपली मिलिटरी हॉस्पिटल उभी आहे जे आपल्या जवानांना उत्तम उत्तम वैद्यकीय सेवा देतात.

ज्या ठिकाणी मायनस 50 अशी रक्त गोठवून टाकणारी थंडी असते, तापमान असतं त्या ठिकाणी या टेंपरेचर पासून किंवा या थंडीपासून बचाव करण्यासाठीचे सर्व साधने उपलब्ध झालेले आहेत.

आधी बऱ्याच ठिकाणी लाईटचे व्यवस्था नसायची, त्या ठिकाणी जाण्याची ट्रान्सपोर्ट व्यवस्था, दळणवळण व्यवस्था चांगली नव्हती ती आता मागच्या दहा वर्षात खूप चांगल्या प्रकारे उपलब्ध झाली आहे. आपल्या सर्व जवानांचे भारतीय सैन्याचे मनोबळ सध्या खूप चांगले आहे.

जेव्हा आपले जवान सीमेवर असतात त्यांना त्यांच्या कुटुंबीयांची काळजी असते तर अशा सर्व कुटुंबीयांचं खूप चांगल्या प्रकारे काळजी घेण्यात येते, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्यात येतं व चांगली वैद्यकीय सेवा सुद्धा त्यांना मोफत देण्यात येते.

थोडक्यात मागच्या दहा-पंधरा वर्षात आपल्या भारतीय सेनेमध्ये मोठ्या प्रमाणात खूप चांगला बदल झालेला आहे.

अन्य लेख

संबंधित लेख