Thursday, September 19, 2024

भारतीय महिलांनी पटकावले जॉर्डन येथे अंडर 17 कुस्ती विश्व चॅम्पियनशिपमध्ये पहिले सांघिक विजेतेपद

Share

अम्मान, जॉर्डन येथे सुरू असलेल्या जागतिक अंडर-17 कुस्ती स्पर्धेत भारतीय महिलांनी 185 गुणांसह त्यांचे पहिले सांघिक विजेतेपद जिंकून आपले वर्चस्व वाढवले. जपान १४६ गुणांसह दुसऱ्या तर कझाकिस्तान ७९ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. सुवर्णपदक जिंकणारी काजल देशातील पाचवी महिला कुस्तीपटू ठरली. काजलने ६९ किलो वजनी गटात युक्रेनच्या ओलेक्झांड्रा रायबॅकवर ९-२ असा विजय मिळवला.

46 किलो गटात श्रुतिका पाटीलला जपानच्या यू कात्सुमेकडून पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. राज बालाने 40 किलो गटात जपानच्या मोनाका उमेकावावर 11-5 असा विजय मिळवून कांस्यपदक जिंकले, तर मुस्कानने 53 किलो वजनी गटात कांस्य प्ले-ऑफमध्ये तांत्रिक श्रेष्ठतेने यूएसएच्या इसाबेला गोन्झालेसचा पराभव करून भारतीय संघात भर घातली. भारतीय महिलांनी पाच सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य पदकांसह आठ पदके जिंकली.

दुसरीकडे, भारताच्या पुरुष फ्रीस्टाइल कुस्तीपटूंना त्यांच्या महिला समकक्षांच्या यशाची पुनरावृत्ती करता आली नाही, कारण कालच्या पाच कुस्तीपटूंपैकी एकही उपांत्य फेरीत पोहोचू शकला नाही. भारताच्या नावावर आता चॅम्पियनशिपमध्ये एकूण 10 पदके आहेत, ज्यात ग्रीको-रोमन कुस्तीमधील दोन कांस्य पदकांचा समावेश आहे.

अन्य लेख

संबंधित लेख