Friday, December 27, 2024

पूंछ येथे रस्ते अपघातात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद, राज्य सरकारकडून १ कोटींची मदत जाहीर

Share

मुंबई : जम्मू-कश्मीरमधील पूंछ येथे कर्तव्य बजावत असताना झालेल्या रस्ते अपघातात राज्यातील दोन जवानांचा मृत्यू झाला. या शूर जवानांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने १ कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी या जवानांना आदरांजली अर्पण केली आहे.

या अपघातात भारतीय सैन्यदलाचे पाच जवान शहीद झाले. यामध्ये मराठा रेजिमेंटचे नायक शुभम समाधान घाडगे हे सातारा जिल्ह्यातील कामेरी गावातील होते, तर सिपॉय अक्षय दिगंबर निकुरे हे चंद्रपूर जिल्ह्यातील पिंपळगावचे रहिवासी होते. या दोन्ही जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत तसेच इतर लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

अन्य लेख

संबंधित लेख