Maharashtra SSC Result 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) बारावीचा निकाल (HSC Result) 21 मे रोजी जाहीर करण्यात आला. आता दहावीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निकालाची विद्यार्थी आणि पालक आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच, शालेय शिक्षण मंत्र्यांनी दहावीचा निकाल (Maharashtra SSC Result) 27 मे पर्यंत लागेल, असं सांगितलं.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अजूनही दहावीच्या निकालाबद्दलची तारीख ही जाहीर करण्यात नाही आली. मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात निकाल लागणार असल्याचे सांगण्यात आलंय. मात्र, अजूनही बोर्डाकडून दहावीच्या निकालाबद्दलचे कोणतेही अपडेट आले नाहीये. दहावीचे विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. mahresult.nic.in, mahahsscboard.in, या साईटवर जाऊन विद्यार्थी दहावीचा निकाल पाहू शकतात. अगोदर ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर केला जाईल, त्यानंतर काही दिवसांनी विद्यार्थ्यांना मार्कशीट मिळेल.