Friday, December 27, 2024

नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील 6 खासदारांना कोणतं खातं मिळाले?

Share

महाराष्ट्र : “कॅबिनेट 3.0” (Modi Cabinet 3.0) असे नाव असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या विस्तारात महाराष्ट्रातील (Maharashtra) 6 खासदारांची निवड झाली आहे. यापैकी 2 खासदारांना (नितीन गडकरी आणि पियुष गोयल) केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं आहे. शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांना स्वतंत्र प्रभार राज्यमंत्रीपद तर खासदार रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ आणि रामदास आठवले यांना राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातील नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि पियुष गोयल (Piyush Goyal) या दोघांनीही कॅबिनेट मंत्री म्हणून आपली पदे कायम ठेवली आहेत. पुन्हा एकदा नितीन गडकरी यांना त्य्नाच्या आवडतीचे खाते परिवहन आणि रस्ते विकास मंत्रालय देण्यात आलं आहे. पियूष गोयल यांना पुन्हा वाणिज्य खातं देण्यात आलं आहे. तर खासदार रामदास आठवले (Ramdas Athawale) यांना पुन्हा एकदा समाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून आलेल्या भाजपच्या खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना क्रीडा आणि युवक कल्याण विभागाचं राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांना आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याचं स्वतंत्र प्रभार राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. तर पुण्याचे भाजपचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. त्यांना सहकार आणि नागरी उड्डाण सारख्या भारदस्त खात्यांची जबाबदारी मिळाली आहे.

अन्य लेख

संबंधित लेख