Thursday, November 21, 2024

उद्धव ठाकरे देशात आणि राज्यात शरिया कायदा लागू करण्यासाठी लढलेत?

Share

नितेश राणे : “आम्ही मराठा आणि दलित मतांपेक्षा मुस्लिम मतांमुळे निवडून आलो आहोत,” असं उबाठा गटाचे खासदार संजय जाधव (MP Sanjay Jadhav) यांनी खुल्या मनाने स्विकारलं. वक्तव्याचा आधार घेत नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर जोरदार प्रहार केला आहे. तुम्ही संविधान वाचवण्यासाठी लढलात की, देशात आणि राज्यात शरिया कायदा (Sharia law) लागू करण्यासाठी लढलात? संविधान वाचवण्याची ओरड घालायची आणि तुमचा खरा हेतू शरिया कायदा लागू करणं होता का?” असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊतांना केला आहे.

शिवाय उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाआधी टिपू सुलतान आणि औरंगजेबाचे स्मारक बांधा अशी मागणी केली तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही, असा टोलाही राणेंनी लगावला. उद्धव ठाकरेंच्या खासदारांच्या मिरवणूकीत भगवा गुलाल नाही तर हिरवा गुलाल उधळला जात आहे. म्हणजे सगळीकडे शरिया कायदा लागू करण्याचा प्रकार सुरु झालाय त्याला उद्धव ठाकरेंचा पाठींबा आहे का? १९९३ च्या दंगलीनंतर मुंबईतील हिंदुंना बाळासाहेबांनी वाचवलं. पण चुकून परत कधी मुंबईत अशी दंगल झाली तर उद्धव ठाकरे हिंदू समाजाच्या बाजूने उभे राहतील का?” असाही सवालही नितेश राणेंनी ठाकरेंना केला आहे.

अन्य लेख

संबंधित लेख