Sunday, July 14, 2024

मुसळधार पावसाने मुंबईत जनजीवन विस्कळीत; मुख्यमंत्री शिंदेंकडून नागरिकांनी आवाहन

Share

मुंबई : भारताचे आर्थिक केंद्र असलेले मुंबई (Mumbai) शहर मुसळधार पावसाच्या (Rain) तडाख्यात सापडले आहे. मुसळधार पावसाने शहर ठप्प झाले आहे. दरम्यान, या स्थिती संदर्भात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाचं ट्विट केलं आहे. “गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. अशी सुचना मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे. तसेच मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करावे” असं आवाहनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी नागरिकांना केलय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “मुंबईत सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली असून रेल्वे मार्गावरील वाहतूकही बाधित झाली आहे. ट्रॅकवरील पाणी काढण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू असून लवकरच वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व आपत्कालीन यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश मी दिले आहेत.” अशी माहिती त्यांनी ट्विटर वर ट्विट करून दिली.

अन्य लेख

संबंधित लेख