Friday, September 20, 2024

मुंगेरीलाल के हसीन सपने…, जयंत पाटलांची मुख्यमंत्री पदाची इच्छा

Share

“जयंत पाटलांना आजकाल मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पडायला लागले आहेत” अशी टीका भाजपा नेते आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे. त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले कि “मुंगेरीलाल के हसीन सपने…, जयंत पाटलांना आजकाल मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पडायला लागले आहेत! दोन मारा पण बाजीराव म्हणणारे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत त्यामुळे आता ताई मुख्यमंत्री होणार का, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, पृथ्वीराज बाबा, बाळासाहेब थोरात, नाना पाटोले का संजय राऊत मुख्यमंत्री होणार यामध्ये आता रस्सीखेच चालू आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या मानात लड्डू फूट रहे है. अशा प्रकारची परिस्थिती महाविकास आघाडी मध्ये झालेली आहे. असा टोला यावेळी प्रसाद लाड यांनी महाविकास आघाडीतील नेत्यावर लगावला.

ते पुढे म्हणाले, “आम्हाला शंभर टक्के खात्री आहे राज्यामधील जनता, बहीण, लोक आम्हाला आम्ही राज्यात केलेल्या विकास काम, लोकहितार्थ काम, लाभार्थीचे काम, जनतेची काम तसेच, केंद्र सरकारने मागच्या दहा वर्षात नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात केलेलं काम असेल यामध्ये निश्चितपणे माननीय एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, अजित दादा पवार आणि महायुतीच्या माध्यमातून सर्व समाज सर्व घटक कष्टकरी, शेतकरी, कामगार, महिला, उपेक्षित, युवक, तरुण-तरुणी, हे राज्यामध्ये महायुतीचे माघे उभे राहतील अशी खात्री आहे, असे ते म्हणाले.

अन्य लेख

संबंधित लेख