Friday, November 22, 2024

महाभकास आघाडीचा पुरुषी अंहकार – लाडकी बहीण योजनेचा विरोध करून आदिवासी महिलांचा अपमान

Share

भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मते 2047 मध्ये विकसित भारताचे स्वप्न तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा समाजात 50% वाटा असणा-या माता-भगिनी समाजाच्या केंद्रस्थानी येतील, समाजाच्या विकासात हातभार लावतील. ह्याच स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केली. समाजातील ग्रामीण भागातील महिलांना विशेष करून आदिवासी महिलांना आर्थिक साहाय्य मिळावे, या उदात्त हेतूने ही योजना सुरू केली आहे. महिला मग त्या उच्चशिक्षित असो वा निरक्षर, शहरी असो वा ग्रामीण आणि आदिवासी, त्यांच्याशिवाय देशाची प्रगती असंभव आहे. परंतू विरोधी पक्ष अर्थात महाभकास आघाडी यांना मात्र यातही राजकारण दिसत आहे. गेल्या 70 वर्षात या घराणेशाही पक्षांनी आपले भले करण्यापलीकडे काहीही केलेले नाही. एकही महिला हिताचा निर्णय घेतलेला नाही.उलटपक्षी  महिला अबला आहेत, त्या समाजाचा दुय्यम घटक आहेत, असेच त्यांनी त्यांच्या भाषणातून, घेतलेल्या निर्णयातून दाखवून दिले आहे.इतकी वर्षे सत्तेत असूनही ट्रिपल तलाक, महिला आरक्षण, सैन्यात महिलांना उच्चपदी नेमणूक असे अनेक महत्वपूर्ण आणि प्रलंबित निर्णय घेण्याचे त्यांनी टाळले.महिलांचे आर्थिक, सामाजिक प्रबलीकरण यांना नको आहे की काय? हाच प्रश्न पडतो. ही महभकास आघाडी तर आदिवासी विरोधीच आहे.मुळात ह्यांच्या शासनकाळात ह्या समाजाला कायम डावलले गेले. इतकेच काय परंतु स्वतंत्र भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती मा. द्रौपदी मुर्मु यांच्या निवडीवरून राजकारण करत, त्याला विरोध करणे हे तर अनाकलनीय आहे.

आताही लाडकी बहीण योजना यशस्वी होताना पाहून, ह्यांच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यांचा ह्या योजनेला विरोध म्हणजे समस्त महिला आणि विशेषत: आदिवासी महिलांचा हा अपमान आहे. अजूनही महाराष्ट्रात ग्रामीण महिला आर्थिक दृष्ट्या म्हणाव्या तितक्या सक्षम नाहीत.आदिवासी महिलांचे दरडोई उत्पन्न तर 9 ते 10 रुपये इतके अल्प आहे.असे असताना जर शासनाने महिलांचा विचार करून त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी  1500 रुपये त्यांच्या खात्यात भरले तर यांचे डोके फिरण्याचे कारण काय? राजकारणासाठी किती खालच्या पातळीवर जाणार… ह्या योजनेला त्यांचा विरोध म्हणजे समस्त महिला आणि आदिवासी महिलांचा अपमानच आहे.फक्त मते,सत्ता आणि राजकारण यासाठी किती दिवस महिलांना अशी वागणूक देणार आहे ही महाभकास आघाडी?

बिजली चमकती है तो आकाश बदल देती है..
आँधी उठती है,तो दिन रात बदल देती है..
जब गरजती है नारीशक्ती तो इतिहास बदल देती है…

ज्या माता भगिनींना ही महाभकास आघाडी प्रताडीत करत आहे, तीच नारीशक्ती मतदानातून या महाभकास आघाडीला अद्दल घडविल्याशिवाय राहणार नाही, हे नक्की

अन्य लेख

संबंधित लेख