Tuesday, September 17, 2024

मविआला महाराष्ट्रात दंगली घडवायच्यात; जाती- जातीमध्ये…

Share

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेवरून विरोधकांनी महायुती सरकारला चांगलाच सुनावलं. या घटनेवरून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील माफी मागितली आहे. आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त राजा महाराज, राजपुरुष नाहीत तर आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहेत. मी आज डोकं झुकवून माझ्या आराध्य दैवतेला चरणावर मस्तक ठेवून माफी मागत आहे अशा शब्दात पंतप्रधानांनी जाहीर माफी मागितली आहे. पण ही राजकीय माफी असल्याची टीका विरोधक करत आहेत. यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते, आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी प्रत्युत्तर दिलंय.

शिवरायांचा पुतळा कोसळल्याचा निषेध करण्यासाची महाविकास आघाडी उद्या मोर्चा काढणार आहे. मात्र अद्याप या मोर्चाला पोलिसांची परवानगी मिळालेली नाही. यावर संजय शिरसाटांनी भाष्य केलंय. मविआ कोणताही विषय गांभीर्याने घेत नाही. त्यांना महाराष्ट्रामध्ये दंगली घडवायच्या आहेत. जाती- जातीमध्ये दंगली घडवून आणायच्या आहेत आणि हे सगळं महायुतीमुळे घडतंय असं चित्र त्यांना जनतेला दाखवायचं आहे. याची गुप्तवार्ता पोलिसांना पोहोचली असावी, म्हणून पोलिसांनी त्यांच्या मोर्चाला परवानगी दिली नसावी. तरी परवानगी घेऊन मोर्चा काढला आणि दंगल घडवण्याचा प्रयत्न केला. तर सरकार हातावर हात धरून बसणार नाही. चोख उत्तर त्यांना दिलं जाईल, असं शिरसाट म्हणाले आहेत.

ते पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच माफी मागितली आहे. यामध्ये कुठेही नाटकीपणा नव्हता. कारण महापुरुषांची माफी मागताना लाज वाटण्याचं कसलंही कारण नाही. सर्व महापुरुषांचा आदर आपण केला पाहिजे. त्यामुळे त्यांनी माफी मागितली आहे. काँग्रेस पक्षाला त्यांच्या मताचं राजकारण करायचं आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडी फक्त आग लावण्याचं काम करत आहेत देखील असं संजय शिरसाट म्हणाले आहेत.

अन्य लेख

संबंधित लेख