नांदगाव शहरासाठी आजचा दिवस अत्यंत भाग्याचा असून शिवछत्रपतींची शिवसृष्टी नांदगावात उभारली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे राज्याचे नव्हे तर संपूर्ण देशाचे आराध्य दैवत असून त्यांनी दाखवलेल्या मार्गावरच महायुतीचे सरकार काम करत आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदगावमध्ये केले. नांदगाव येथे शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलत होते.
https://twitter.com/mieknathshinde/status/1829564526582456459/photo/1
नांदगाव नगरपरिषद मोडकळीस आलेल्या इमारतीला १० कोटी रुपये देऊ असे याप्रसंगी जाहीर केले. तसेच शिवसृष्टीचा दुसऱ्या टप्प्याला निधी कमी पडू देणार नाही, असेही सांगितले. शहरातील बंदिस्त पाईपलाईनचा प्रश्नाबाबत बैठक झाली असून तो प्रश्नही मार्गी लावू असे यावेळी सांगितले. तर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विषयाबाबत शेतकरी आमच्याकडे निवेदन घेऊन येत आहेत त्यांना देखील मदत केली जाईल असे स्पष्ट केले.
साडेसात एचपीपर्यंत वीज वापरणाऱ्या शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून १ रुपयात पीकविमा योजना आणली आहे. सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई सरकारने दिलेली आहे. महिला, शेतकरी, युवक-युवती, ज्येष्ठ नागरिक सर्वांना न्याय देण्यासाठी योजना आणली असल्याचे यासमयी अधोरेखित केले
राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वयंपूर्ण करण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. मुलींच्या जन्मानंतर तिचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिच्यासाठी ‘लेक लाडकी योजना’ सुरू केली आहे. मुलींना संपूर्णपणे मोफत उच्च शिक्षण घेता यावे यासाठी निर्णय घेतला.
महिला भगिनींसाठी ३ सिलेंडर मोफत देणारी ‘अन्नपूर्णा योजना’ सुरू केली आहे. महिलांना लखपती बनवण्यासाठी ‘लखपती दीदी’ बनवण्याचे उद्दिष्ट्य समोर ठेवले असल्याचे याप्रसंगी नमूद केले. सरकारला तुम्ही साथ दिलीत तर लाडकी बहिण योजनेचे पैसे नक्की वाढवू, असेही यावेळी सांगितले.