Monday, October 7, 2024

शिवाजी पार्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एकाच मंचावर येणार

Share

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पाचव्या टप्यात राज्यातील १३ जागांसह मुंबईतील सहा जागांवर २० मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी आज (१७ मे शुक्रवार) मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्कवर (Shivaji Park) महायुतीची संध्याकाळी पाच वाजता जाहीर सभा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) पहिल्यांदाच एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत. 

दरम्यान, या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. यावेळी हे दोन नेते आज सभेत मुंबईकरांना काय आवाहन करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मुंबईमधील ६ लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा आज शिवतीर्थ येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेला केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) सुद्धा उपस्थित राहणार आहे.  तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, हे देखील उपस्थित राहणार आहेत.

अन्य लेख

संबंधित लेख