Wednesday, December 4, 2024

नाशिकमध्ये भाजपची मोठी कारवाई, ७ माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

Share

विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंड केल्याच्या कारणावरून भारतीय जनता पक्षाने (भाजप) नाशिक शहरात कडक कारवाई केली आहे. या कारवाईत भाजपने दिनकर पाटील, कमलेश बोडके, गणेश गीते यांच्यासह सात माजी नगरसेवकांना व विविध पदाधिकारांना पक्षातून बाहेर काढले आहे.

निवडणुकीच्या तोंडावर असताना पक्षाच्या धोरणांचे उल्लंघन करून विरोधी उमेदवारांना पाठिंबा देणारे हे पदाधिकारी व नगरसेवक होते. भाजपच्या मध्यवर्ती नेतृत्वाने त्यांना पक्षातील सर्व पदे व जबाबदाऱ्या तात्काळ काढून घेतल्या. ही कारवाई पक्षाची शिस्त राखण्यासाठी आणि निवडणुकीतील पक्षाची एकजूट टिकवण्यासाठी करण्यात आली आहे.

दिनकर पाटील, कमलेश बोडके आणि गणेश गीते यांच्यावर पक्षाला नुकसान पोहोचविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यांच्यावर आर्थिक व्यवहारांशी संबंधित काही आरोपही झाले असून, त्याची चौकशी सुरू आहे. या घडामोडीमुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.भाजपच्या या कारवाईने नाशिकच्या राजकारणात नवीन वळण आले आहे. पक्षाच्या या निर्णयाचा परिणाम निवडणुकीच्या रणनीती आणि पक्षाच्या मतदारांवर कसा होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अन्य लेख

संबंधित लेख