नाशिक लोकसभा मतदारसंघ : नाशिकच्या (Nashik) जागेच्या अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) घेतील असं महत्त्वाचं वक्तव्य भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केले आहे. नाशिकची जागा १००% शिवसेनेचीच असून उमेदवारी कोणाला द्यायची याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री शिंदेच घेतील असं बावनकुळे यांनी सांगितले. नाशिकमध्ये त्यांनी छगन भुजबळांची (Chhagan Bhujbal) भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
दरम्यान महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी 51 टक्के मते कसे मिळतील आणि ते कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न कारणार आहे. महायुतीचा सेटअप तयार आहे. एकनाथ शिंदे यांनी नाव जाहीर करताच आम्ही कामाला लागू. प्रचारासाठी 18 दिवस बाकी आहेत. ही जनतेची निवडणूक आहे, जनतेला मोदीजींना पंतप्रधान करायचे आहे. लोकांना मोदींना मतदान करायचं आहे, असंही ते यावेळी म्हणाले.
Share
अन्य लेख