Wednesday, December 4, 2024

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची घेतली भेट

Share

रशियातील सेंट पिटर्स बर्ग इथ सुरू असलेल्या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बैठकीच्या पार्श्वभूमीवर, काल भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी रशियाचे राष्ट्रपती ब्लादी मीर पुतीन यांची भेट घेतली. याबाबत रशियाच्या भारतातील दूतावसाने एक निवेदन प्रसिद्ध केल असून त्याबाबत माहिती दिली आहे. या भेटीत पुतीन यांनी भारत आणि रशिया दरम्यान विशेष धोरणात्मक भागीदारीची प्रशंसा केली आणि द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या दृष्टीने सुरक्षेच्या मुद्द्यावर जास्त भर देण्याची इच्छा व्यक्त केली. येत्या 22 ऑक्टोबरला कझान इथ होणाऱ्या ब्रिक्स देशांच्या संमेलना वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबर द्विपक्षीय संबंध सुधारण्याबाबत भेट ठरवण्याचा प्रस्ताव ही पुतीन यांनी यावेळी मांडला.

अन्य लेख

संबंधित लेख