मुंबई : नेपाळमध्ये झालेल्या बस दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील २४ जणांच्या मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त करीत कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे. या अपघातातील नेपाळमध्ये झालेल्या या दुर्दैवी अपघाताची माहिती मिळताच, मुख्यमंत्री शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि वरिष्ठ केंद्रीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला. मृतदेह महाराष्ट्रात आणण्यासाठी केंद्राकडून सर्वतोपरी मदत मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विनंती केली होती, ज्याला तातडीने प्रतिसाद देत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. वायुसेनेच्या विमानाने शनिवारी २४ जणांचे मृतदेह नाशिक येथे आणण्यात येणार आहेत. तेथून कुटुंबियांकडे ते पोहोचविण्यात येणार आहेत.
मुंबई : नेपाळमध्ये झालेल्या दुर्दैवी बस दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील २४ जणांच्या मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त करीत कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे. याअपघातातील मृतदेह तातडीने महाराष्ट्रात आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय वरीष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. याप्रकरणी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांना दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला तात्काळ प्रतिसाद देत वायुसेनेच्या विमानाने शनिवारी २४ जणांचे मृतदेह नाशिक येथे आणण्यात येणार आहेत. तेथून कुटुंबियांकडे ते पोहोचविण्यात येणार आहेत.
जळगाव जिल्ह्यातील भाविकांच्या बसला नेपाळमध्ये दुर्घटना झाल्याने २४ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी कळताच मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील मदत व पुनर्वसन विभागातील अधिकारी, केंद्रीय अधिकारी यांच्याशी सातत्याने संवाद साधत मदतीच्या कामाची माहिती घेतली.
मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संवाद साधून भाविकांचे मृतदेह महाराष्ट्रात तातडीने आणण्याकरिता विनंती केली होती. याप्रकरणी राज्याला सर्वतोपरी मदत करू. त्यासाठी समन्वयासाठी विशेष अधिकारी नियुक्त केल्याचेही केंद्रीय गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या मागणीला तात्काळ प्रतिसाद वायुसेनेचे विशेष विमान मृतदेह आणण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उद्या हे मृतदेह नेपाळवरून उत्तर प्रदेशातील गोरखपुर येथे आणण्यात येतील. तेथून वायुसेनेच्या विमानाने नाशिक येथे ते आणले जातील. त्यानंतर कुटुंबियांकडे मृतदेह सोपविण्यात येणार आहेत.
- अयोध्या: धर्मध्वज फडकवला, सांस्कृतिक पुनरुत्थानाचा नवा अध्याय!
- राज्य भाषा शिकण्याला परकीय भाषा शिकण्याच्या बरोबरीने महत्व द्यायला हवे
- शिवप्रतापदिन: जिजाऊंचे देणे अन् शिवरायांचे शौर्य: ३२ दातांच्या बोकडाचा वध
- ‘त्या’ ६० तासांचे विस्मृत धडे…
- ५०० वर्षांची प्रतीक्षा संपली! PM मोदी आणि डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते राम मंदिराच्या शिखरावर ऐतिहासिक ‘धर्म ध्वजारोहण’ संपन्न