Saturday, July 27, 2024

भारताला विश्वगुरू बनवायचा मार्ग या निवडणुकितून मिळणार आहे – नितीन गडकरी

Share

शिरूर लोकसभा : “लोकसभेची निवडणूक ही देशाची आहे. देशाचं भविष्य घडविणे, भारताला विश्वगुरू बनवायचा मार्ग या निवडणुकितून मिळणार आहे. गरीब मजूर शेतकऱ्यांचे कल्याण करायचे, तरुण मुलांच्या हाताला काम द्यायचे, गाव सुखी समृद्ध संपन्न करायचे ही आमची संकल्पना आहे. आणि हे स्वप्न संपूर्ण करायचा असेल तर मोदीजींच्या नेतृत्वाखाली एनडीएचा सरकार दिल्लीमध्ये आणलं पाहिजे, असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी शनिवारी केले. शिरूर लोकसभा (Shirur Loksabha) मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.

“महायुतीचे उमेदवार आढळरांची ही पहिली निवडणूक नाही या मतदारसंघात जी काही कामे झाली आहेत त्याचा पाठपुरावा त्यांनी केलेला आहे. मागील काळामध्ये आढळराव सातत्याने अनेक वेळा माझ्याकडे आले या कामाचा त्यांनी फॉलो केला आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की पुन्हा एकदा तुमची स्वप्न पूर्ण करण्याकरता घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

“शहरात मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या वाढते आहे त्यामुळे स्वाभाविकपणे आज कितीही रस्ते बांधले तरी ट्रॅफिक कमी होत नाही. पुण्यापासून संभाजीनगर पर्यंत एक नवीन रस्ता बांधायचा निर्णय केलेला आहे आणि हे काम आम्ही महाराष्ट्र सरकारच्या एमएसआईडीसीला देण्याचा निर्णय घेतला आहे. संभाजीनगर दोन तासांमध्ये पण त्याचबरोबर पुणे, मुंबई, सोलापूर आणि कोल्हापूरचा ट्रॅफिक कमी करण्याचा खूप मोठा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे, या नवीन मार्गामुळे आपल्या शहरांवरील वाहतुकीचा बहार कमी होणार आहे. नवी दिल्ली ते मुंबई हा मेगा हायवे लवकरच पूर्ण होणार आहे त्याला जोडणारा हा मार्ग दक्षिणेत जाणारा असेल असंगी यावेळी नितीन गडकरी यांनी सांगितले.

अन्य लेख

संबंधित लेख