Saturday, October 12, 2024

निवडणूक आयोगाचे पथक 27 रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर : विधानसभेच्या निवडणुकीची लवकरच घोषणा होण्याची शक्यता

Share

केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक आगामी 27 आणि 28 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे पथक दौऱ्यावर येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात झाली आहे.

या दोन दिवसीय दौऱ्यात केंद्रीय निवडणूक आयोग राज्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. या बैठकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊ शकतात, असा अंदाज आहे. या दोन दिवसीय दौऱ्यात निवडणूक आयोगाचे पथक पहिल्या दिवशी म्हणजेच 27 तारखेला राजकीय पक्षाचे प्रतिनिधी तसेच प्रशासनातील विविध अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. तर 28 सप्टेंबरला निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे.

देशातील जम्मू-काश्मीर, हरियाणासोबतच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. महाराष्ट्राच्या वर्तमान विधानसभेचा कार्यकाळ आगामी 26 नोव्हेंबर 2024 रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे राज्यात नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. वेळेत निवडणूका घेणे, ही घटनात्मक सक्ती आहे. 

अन्य लेख

संबंधित लेख