Monday, December 29, 2025

देश आधी की राजकीय द्वेष? पाकिस्तानाने मानली हार, मग भारतीय विरोधकांना पुरावे कशाला हवेत?

Share

मुंबई : मे २०२५ मध्ये भारतीय लष्कराने दहशतवादाचा कणा मोडण्यासाठी पाकिस्तानात घुसून केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) या मोहिमेच्या शौर्यावर आणि यशावर शंका घेणाऱ्या भारतातील विरोधकांना आता खुद्द पाकिस्तानच्या सर्वोच्च नेतृत्वानेच ‘आरसा’ दाखवला आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या मुद्द्यावरून काँग्रेस आणि उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटावर बोचरी टीका केली आहे.

पाकिस्तानची ती ‘कबुली’ अन् विरोधकांची कोंडी
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानची किती दैना झाली होती, हे आता उघड झाले आहे. केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटमध्ये पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी आणि उपपंतप्रधान इशाक दार यांच्या विधानांचा दाखला दिला आहे.

पाकिस्तानचे राष्ट्रपती झरदारी यांनी कबूल केले की, ऑपरेशन सिंदूर सुरू असताना पाकिस्तानी लष्करी अधिकारी जीवाच्या भीतीने बंकरमध्ये लपून बसले होते. इतकेच नाही तर झरदारींना स्वतःलाही तिथे लपण्याचा सल्ला देण्यात आला होता.

पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनीही या मोहिमेत पाकिस्तानचे प्रचंड नुकसान झाल्याचे मान्य केले आहे. भारताच्या या धडाकेबाज कारवाईत पाकिस्तानचे ११ हवाई तळ निकामी झाले होते, अशी धक्कादायक कबुली त्यांनी दिली आहे.

केशव उपाध्ये यांचे ट्विट जसेच्या तसे

“काँग्रेस, उबाठा आणि इतर विरोधक
ऑपरेशन सिंदूरवर शंका घेत होते.

पण त्यांना सणसणीत उत्तर
आज दस्तुरखुद्द पाकिस्तानकडूनच मिळालं आहे.

पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी कबूल केलं —
▪️ ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानी लष्करी अधिकारी बंकरमध्ये लपले होते
▪️ मलाही तिथे लपण्याचा सल्ला देण्यात आला होता

पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांचीही कबुली —
▪️या मोहिमेत पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं
▪️११ हवाई तळ उद्ध्वस्त झाले

हे भाजपाचं वक्तव्य नाही.
हे भारतीय माध्यमांचं दावे नाहीत.
ही पाकिस्तानची उघड कबुली आहे.

मग प्रश्न एकच —
मोदीविरोध नसनसात भरलेले विरोधक
पाकिस्तानच्या कबुलीवर तरी विश्वास ठेवणार आहेत का?

देश आधी की राजकीय द्वेष?”

उपाध्ये यांनी विरोधकांना थेट सवाल केला आहे की, ज्या पुराव्यांची ते मागणी करत होते, ते पुरावे आता खुद्द शत्रू राष्ट्रानेच दिले आहेत. मोदींविरोधात असलेल्या द्वेषामुळे विरोधक आपल्याच सैन्याच्या पराक्रमावर शंका घेत आहेत का? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’ ही भारताने मे २०२५ मध्ये पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी केलेली एक मोठी लष्करी कारवाई होती. या मोहिमेने भारताची लष्करी ताकद जगाला दाखवून दिली आहे.

अन्य लेख

संबंधित लेख