Wednesday, January 15, 2025

पंतप्रधान मोदींनी केले पॅरालिम्पिक मध्ये पदकांचा इतिहास रचणाऱ्या पॅरा ऍथलीट्सचे अभिनंदन

Share

पॅरिस पॅरालिम्पिकमधील सर्व पदक विजेत्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरालिम्पिकच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक पदके जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे. सोशल मीडिया पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले, हे भारतीय खेळाडूंचे समर्पण, उत्कटता आणि दृढनिश्चय दर्शवते.

पॅरिस पॅरालिम्पिक्स 2024 हे भारतीय खेळाडूंसाठी ऐतिहासिक ठरले आहे. अवघ्या ७ दिवसांत भारताने आपल्या मागील सर्वोत्कृष्ट पदक विजयांचा विक्रम मोडला आहे. टोक्यो पॅरालिम्पिक्समध्ये भारताने १९ पदके जिंकली होती, पण यंदा त्यांच्या कामगिरीने सर्वांनाच आश्चर्यचकित करून सोडले आहे . भारताने आतापर्यंत २४ पदके जिंकली आहेत, ज्यामध्ये ५ सुवर्ण, ९ रौप्य आणि १० कांस्य पदकांचा समावेश आहे.

अन्य लेख

संबंधित लेख