जळगाव : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीत दि. २५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय ‘लखपती दीदी’ (Lakhpati Didi) हा ऐतिहासिक महिलांचा मेळावा जळगाव (Jalgaon) येथील छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील विमानतळाच्या समोरच्या विस्तीर्ण अशा जागेवर होणार आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी या जागेची पाहणी केली व तयारीचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
यावेळी त्यांच्या समवेत केंद्रीय ग्राम विकास मंत्रालयाच्या संयुक्त सचिव स्वाती शर्मा, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामीण विकास यंत्रणा या विभागाचे अधिकारी यावेळी उवस्थित होते.
शहरासह छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर वाहतुकीच्या दृष्टीने कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांसाठी एक आराखडा तयार केला जाणार आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर, जामनेर मार्गावरची वाहतूक अन्य मार्गावर वळविण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन!
- फडणवीसांचे ‘महा-AI’ शेती व्हिजन
- ‘मराठीसाठी लढायचे असेल तर मोहम्मद अली रोडवर जा, दाढीवाल्यांना सांगा!; नितेश राणे कडाडले
- राज्याला उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र बनवणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
- शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मच्छिमार आणि मेंढपाळांच्या समस्यांवर सरकार सकारात्मक – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे