Monday, November 25, 2024

आता त्यांना शिक्षा देण्याची वेळ आली आहे; नरेंद्र मोदींचा पुन्हा शरद पवारांवर हल्लाबोल

Share

लोकसभा निवडणूक २०२४ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या महाराष्ट्र (Maharashtra) दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज राज्यभरात त्यांच्या सभा असून दुपारी माळशिरसमध्ये जाहीर सभा झाली. महायुतीचे उमेदवार रणजित सिंह निंबाळकर हे येथून निवडणूक लढवत आहेत. माळशिरसमधील (Malshiras) सभेत त्यांनी पुन्हा एकदा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली. त्यांनी शरद पवार यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला आहे.

‘पवार हे कृषी मंत्री असताना त्यांनी काय केले असा सवाल त्यांनी विचारला. त्यांच्या कार्यकाळात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी मी पत्रे पाठवून थकलो पण काहीच झाले नाही असा आरोप त्यांनी केला. गेल्या दहा वर्षांत शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या योजनांची जंत्रीच त्यांनी वाचून दाखवली. मोदींची हीच गॅरंटी’, असल्याचा पलटवार त्यांनी विरोधकांवर केला.

‘१५ वर्षांपूर्वी एका मोठ्या नेत्याने निवडणूक लढवाताना इथं पाणी आणण्याचं वचन दिलं होतं. ते पूर्ण झालं का ? नाही ना ? आता त्यांना शिक्षा देण्याची वेळ आली आहे’, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आज त्या नेत्याची इथून निवडणूक लढण्याची हिंमत नाही, अशा शब्दांत त्यांनी शरद पवार यांचे नाव न घेता माढ्यात त्यांनी पुन्हा पवारांना लक्ष्य केले.

अन्य लेख

संबंधित लेख