Monday, December 2, 2024

प्रकाश आंबेडकरांकडून आदिवासी समाजाची दिशाभूल !

Share

प्रकाश आंबेडकर नेहमीच महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करणारे आणि काही वादग्रस्त विधाने करत असतात. यामध्ये त्यांनी केलेले औरंगजेबा बद्दलचे वक्तव्य हा मोठा वादाचा विषय ठरला होता. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य हा एक चर्चेचा विषय असतो.

नुकतेच प्रकाश आंबेडकरांनी महायुती सरकारवर लाडकी बहीण योजने मध्ये आदिवासींच्या सोई सुविधा आणि कल्याणासाठी चे अर्थसंकल्पातील पैसे वापरल्याचा गंभीर आरोप केला आहे.

मात्र जर 2024 च्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी आणि आदिवासी घटकांसाठी वेगवेगळ्या तरतुदीकरण्यात आल्या आहे.या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 24000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे तर आदिवासीं साठी 18,600 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

त्यामुळे प्रकाश आंबेडकर करत असलेल्या गंभीर आरोपाला कुठलेही पुरावे नसल्यामुळे त्यांच्या आरोपांमध्ये कुठलेही तथ्य नसल्याचे समोर येते.

अन्य लेख

संबंधित लेख