Tuesday, September 17, 2024

तीन नव्या वंदे भारत रेल्वेगाड्यांना प्रधानमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा   

Share

पंतप्रधान मोदींनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तीन नवीन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी ते म्हणाले की, वंदे भारत हा भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाचा नवा चेहरा आहे. पंतप्रधान म्हणाले, आज शहरातील प्रत्येक मार्गावर वंदे भारताची मागणी होत आहे. हाय-स्पीड ट्रेन्स लोकांना त्यांचा व्यवसाय, रोजगार आणि स्वप्नांचा विस्तार करण्याचा आत्मविश्वास देतात. आज देशभरात 102 वंदे भारत रेल्वे सेवा कार्यरत आहेत.

वंदे भारत रेल्वेगाड्यांचा वाढता विस्तार, आधुनिकता आणि वेग हे विकसित भारताच्या दिशेनं पडलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे, असंही प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलं. मीरत-लखनौ, मदुराई-बेंगळुरू आणि चेन्नई-नागरकोईल या तीन नव्या वंदे भारत रेल्वेगाड्यांना प्रधानमंत्र्यांनी आज हिरवा झेंडा दाखवला. या गाड्यांमुळे देशातली महत्त्वाची शहरं आणि ऐतिहासिक शहरं जोडली जातील, मंदिरांचं शहर असा लौकिक असलेलं मदुराई माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रणी असलेल्या बेंगळुरूशी जोडलं जाईल, असं प्रधानमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. वंदे भारत जिथं पोहोचते आहे, तिथं पर्यटकांची संख्या आणि पर्यायानं तिथले उद्योग, रोजगाराच्या संधी वाढत आहेत, अनेक मार्गांवर वंदे भारत रेल्वे सुरू करण्याची मागणी होत असून या गाडीतही लवकरच स्लीपर कोच सुरू होणार असल्याची माहितीही मोदी यांनी दिली.

अन्य लेख

संबंधित लेख