Friday, October 18, 2024

मुंबईत टोलनाक्यांवर आज मध्यरात्रीपासून टोलमाफी… राज ठाकरेंची टोलमाफी वर प्रतिक्रिया…

Share

मुंबईत टोलनाक्यांवर आज मध्यरात्रीपासून टोलमाफी…
राज ठाकरेंची टोलमाफी वर प्रतिक्रिया…

मुंबईत प्रवेशद्वार असलेले ऐरोली, वाशी, दहिसर, मुलुंड (LBS मार्ग) आणि मुलुंड (पूर्व द्रुतगती महामार्ग) या 5 टोलनाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना टोलमाफी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समाजमाध्यमावरील संदेशात आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“महाराष्ट्र सैनिकांनो, यापुढे ‘टोलच्या आंदोलनाचं काय झालं?’ असं कोणी विचारलं तर त्यांना मुंबई टोलमुक्तीचं उदाहरण अभिमानाने सांगा आणि तुम्ही एकदा ठरवलंत की गोष्ट तडीस नेता हे पुन्हा एकदा दिसलं हे विसरू नका.

पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन.” असे आशादायी विचार त्यांनी मांडले आहेत.

“टोलच्या व्यवहारात पारदर्शकता हवी, आणि जिथे रस्त्याच्या कामांचे पैसे वसूल झालेत, तिथले रस्ते टोलमुक्त झाले पाहिजेत या मागणीसाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी प्रचंड संघर्ष केला… आम्ही टोलनाक्यांची तोडफोड केली यावरून आमच्यावर टीका झाली, पण सरकार नावाची यंत्रणा कुठलीही असो, त्यांना टोकाचं पाऊल उचलल्याशिवाय गांभीर्य कळत नाही.” असंही राज ठाकरे यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

मुंबईत प्रवेशद्वार असलेले ऐरोली, वाशी, दहिसर, मुलुंड (LBS मार्ग) आणि मुलुंड (पूर्व द्रुतगती महामार्ग) या 5 टोलनाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना टोलमाफी देण्याची घोषणा करण्यात आलीय. आज (14 ऑक्टोबर) मध्यरात्री 12 वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. या टोलनाक्यांवर टोलमाफी व्हावी, अशी मागणी गेली अनेक वर्षे नागरिकांकडून केली जात होती.

अन्य लेख

संबंधित लेख