Sunday, December 22, 2024

राजकोट पुतळा दुर्घटना प्रकरणातील चौकशीला वेग…

Share

महाराष्ट्रातील मालवण इथल्या राजकोट इथल्या पुतळा दुर्घटना प्रकरणातील आरोपी मूर्तीकार जयदीप आपटे आणि सल्लागार चेतन पाटील यांना 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्याचे आदेश सिंधुदूर्ग जिल्हा न्यायालयानं काल दिले. या दोघांनाही काल स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आलं. पाटील याला 30 ऑगस्ट रोजी कोल्हापूर इथून तर आपटेला गेल्या बुधवारी कल्याणमधून अटक करण्यात आली होती. दरम्यान न्यायालयासमोर सर्व समान असून, मूर्तिकार आपटेची सखोल चौकशी करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

पुतळा कोसळल्यानंतर चेतन पाटील याने त्याच्यावरील आरोप फेटाळून लावले होते. आपण फक्त पुतळ्यासाठी उभारण्यात आलेल्या चौथऱ्याचे स्ट्रक्चरल डिझाईन केले होते. पण संपूर्ण पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं नाही. महाराजांच्या पुतळ्याचं जे काम झाले ते ठाण्यातील एका कंपनीला देण्यात आले होते, असेही त्याने स्पष्ट केलं. असे सांगितले. पोलिसांना दोघांचाही सुगावा लागल्याने मालवण पोलिसांचे एक पथक कोल्हापुरात तळ ठोकून बसले होते. चेतन पाटीलचा ठाव ठिकाणा शोधण्यासाठी पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. कोल्हापूरच्या गुन्हे शाखेने त्याच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींकडे चौकशी करून अखेर त्याला ताब्यात घेतले.

अन्य लेख

संबंधित लेख