धुरंधर २ Revenge प्रदर्शित झाल्यापासून आपल्या देशातील तमाम पुरोगामी लिब्रांडू डावे सेक्युलर; बॉलीवूड तसेच राजकारणातील मोजके नाचे आणि देशभरातील इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान प्रेमी मंडळींच्या बुडाला अक्षरशः आग लागली आहे. निर्माते दिग्दर्शक आदित्य धर यांनी आपल्या शत्रू देशात चालणाऱ्या आतंकवादी जिहादी षडयंत्राचे व भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि त्यांच्या योजनेप्रमाणे कराचीचा ताबा घेतलेल्या “धुरंधर”ने इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या त्या जिहादी षडयंत्राच्या उडवलेल्या चिंधड्या इतक्या अप्रतिमपणे दाखवल्या आहेत की. धुरंधर १ आणि धुरंदर २ Revenge या दोन्ही चित्रपटांनी भारतीय चित्रपट सृष्टीचे (बॉलीवूडचे) सगळे नियमच बदलून टाकले आहेत. हिंदू श्रद्धा रुढी परंपरा यांचा कायम अपमान करणारी आणि गुंड लफंगा म्हटला की डोळ्यावर टिळा असलेला हिंदू खलनायक असला पाहिजे ही बॉलीवूडची चौकट धुरंधरने कराचीतील ल्यारीच्या सिंधू सागरात नेऊन बुडवली.
आजपर्यंत कधीही बॉलीवुडने कधीही न घडवलेल्या हिंदूंच्या क्षात्रतेजाचे “यहां नया भारत है, घर में घुसकर मारेगा” चे इतके विलोभनीय दर्शन धुरंदर २ Revenge चित्रपटात आहे की, देशभरातील हिंदू मानस प्रचंड सुखावले आहेत आणि सुखावलेला हिंदू या तमाम पुरोगामी लिब्रांडू डावे सेक्युलर आणि इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानी प्रेमी मंडळींना सहन होणे शक्यच नाही. मग या दळभद्री मंडळींनी धुरंधर २ मधल्या चुका काढायला सुरुवात केली. काय तर म्हणे पात्रे काल्पनिक आहेत. घटना अतिरंजीत आहेत. कथानक विश्वासार्ह नाही. म्हणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा “प्रोपागंडा” आहे.
या भिकारड्या मानसिकतेच्या कोल्ह्याकुत्र्यालांडग्यांना आम्ही धुरंधर चित्रपटातील वास्तव काय होते हे सांगू इच्छितो….
घालीन लोटांगण वंदीन चरण…

गेली किमान ३/३.५ दशके बॉलीवूडचे बहुतांशी चित्रपट दाऊद इब्राहिमच्या पैशावर तयार होत होते. दाऊद म्हणेल तो नायक. दाऊद म्हणेल ती नायिका. दाऊद म्हणेल ते कथानक. दाऊद म्हणेल तो खलनायक. दाऊद म्हणेल ती गाणी. दाऊद म्हणेल ते चित्रपटाचे नाव.
गेली ३ दशके सबंध बॉलीवूड दाऊद इब्राहिमच्या पायाशी लोळण घेत होते. त्याच्या एका निरोपावर दुबईला किंवा बोलवेल तिथे जाऊन त्याला भेटत होते. त्याच्या मिनतवाऱ्या करत होते. दाऊद भाईला नाही म्हणण्याची बिशाद बॉलीवूडमधल्या निर्मात्यापासून स्पॉटबॉयपर्यंत कोणाचीही नव्हती.
चित्रपटात दाऊदचे नाव घेण्याची सोडा, त्याची सावली दाखवण्याची देखील कोणात हिंमत नव्हती. आणि आज धुरंधर २ मध्ये गलितगात्र झालेला, मरणासन्न स्थितीत बिछान्याला खिळलेला, हतबल झालेला केविलवाणा “बडे साहब” अर्थात दाऊद इब्राहिम दाखवला आहे. निर्मात्याचे हे प्रचंड धाडस आहे. नव्हे बॉलीवूडमधील हे “युगांतर” आहे. नव्या युगाची झुंजुमुंजु आहे.
धुरंधर २ मधल्या चुका काढणाऱ्या गांडूळांना एवढी कसली मिरची लागली आहे? त्यांच्या बडे साहेब गलितगात्र दाखवल्याची? की त्याचा कराचीच्या समुद्रकिनाऱ्यावरील क्लिफ्टन रोडवरचा त्याच्या व्हाईट हाऊस बंगल्याचा अचूक पत्ता दाखवल्याची?
शेवटी, “बड़े साहब, मैने तुम्हारा नमक खाया है” म्हणून बॉलिवूड आपल्या मालकाच्या खाल्लेल्या मिठाला जागलेले दिसते.
हा सूर्य हा जयद्रथ…
१) जहूर मिस्त्री उर्फ झाहिद अखुंद…

धुरंधर २ मध्ये दाखवलेला आणि “हिंदू बहुत ही डरपोक कौम है। पड़ोस में रहते हैं हमl गुदेभर का जोर लगा लो और बिगाड़ लो जो बिगाड़ सकते हो।” म्हणून अजीत डोवाल यांना खिजवणारा आणि हमजाने कुत्र्याच्या मौतीने मारलेला हा जाहिद अखुंद.
वास्तवातला हा जहूर इब्राहिम मिस्त्री (Zahoor Ibrahim Mistry). १९९९ मध्ये इंडियन एअरलाइन्सच्या आयसी-८१४ विमानाचे अपहरण करणाऱ्या ५ दहशतवाद्यांपैकी एक. २०१४ नंतर भारतीय “हमजा अली मजारी” कधीही आपल्याला ठांय ठांय ठांय करून ठोकतील या भितीने झहूर मिस्त्री गेल्या अनेक वर्षांपासून आपली ओळख लपवून आणि झाहिद अंखुद या नावाने कराचीमध्ये राहत होता. झहूर मिस्त्री उर्फ झाहिद अंखुदने ‘क्रेसेंट फर्निचर’ नावाने व्यवसाय सुरू केला होता आणि तो कराचीच्या अख्तर कॉलनीमध्ये झाहिद अंखुद या नावाने राहत होता. मिळालेल्या माहितीनुसार, १ मार्च २०२२ रोजी दोन सशस्त्र मोटारसायकल स्वारांनी झहूर मिस्त्री याच्या फर्निचरच्या दुकानाच्या परिसराची पाहणी केली. अख्तर कॉलनीच्या रस्त्यांवर फिरल्यानंतर, एका अज्ञात मोटारसायकल स्वाराने फर्निचरच्या गोदामात प्रवेश करून जहूर मिस्त्रीची गोळ्या घालून चाळण करून टाकली.
धुरंधर २ मध्ये जहूर मिस्त्रीच्या हत्येचा प्रसंग चित्रपटाला आवश्यक असलेला भडकपणा व अतिरंजीत दृश्ये दाखवून रंगवला असेल पण त्याला ठोस अशा सत्य घटनेचा पाया आहे.
मग भारतातील दुतोंडी गांडूळांना नेमके सहन काय झाले नसावे? तर जहूर मिस्त्रीला गोळ्या घालण्यापूर्वी अजित डोवाल आणि हमजा त्याच्याकडून “भारत माता की जय” वदवून घेतात हेच आहे. या प्रसंगाच्या वेळी प्रेक्षक टाळ्या शिट्या आणि “भारत माता की जय” घोषणेचा गजर करतात आणि बहुदा तेच या नतद्रष्टांना सहन होत नसावे.
हा सूर्य हा जयद्रथ… २) अब्दुल रहमान मक्की

अब्दुल रहमान मक्की हा एक इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान मधील कुप्रसिद्ध दहशतवादी होता. तो लश्कर-ए-तोयबा (LeT) या दहशतवादी संघटनेचा नायब अमीर (उपप्रमुख) आणि जमात-उद-दावा (JuD) चा राजकीय प्रमुख होता.
हा मक्की २००० च्या लाल किल्ल्यावरील हल्ल्याचा आणि २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांचा (२६/११) मुख्य सूत्रधार होता. भारतात निधी उभारणे, तरुणांना कट्टरपंथी बनवणे आणि जम्मू व काश्मीरमध्ये दहशत पसरवण्यासाठी तो जबाबदार होता. मक्की हा लष्करचा प्रमुख आणि २६/११ हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदचा मेहुणा आणि चुलत भाऊ होता.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) जानेवारी २०२३ मध्ये त्याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले. अमेरिकेने २०१० मध्येच त्याला दहशतवादी म्हणून घोषित केले होते आणि त्याच्यावर २ दशलक्ष डॉलर्स (२० लाख अमेरिकन डॉलर्स) चे बक्षीस ठेवले होते. त्याला बऱ्याच काळापासून मधुमेहाचा त्रास होता आणि लाहोरमध्ये उपचार घेत असताना २७ डिसेंबर २०२४ रोजी लाहोरमधील एका खाजगी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला असे सांगितले जाते.
चित्रपटात इस्पितळात एक (अनोळखी) नर्स येऊन त्याला सलाईनमधून विषारी औषध देते आणि मक्की कायमचा झोपतो असे दाखवले आहे. अब्दुल रहमान मक्कीला अशाप्रकारे मारला असेल वा नसेल पण नसेलच याची खात्री भारतातील हे कुत्रेकोल्हेलांडगे कशी काय देऊ शकतात? ती अनोळखी नर्स ज्या सफाईदारपणे अब्दुल रहमान मक्कीचा काटा काढते बहुदा तेच या कोल्ह्याकुत्र्यालांडग्यांना कल्पनेतदेखील सहन झाले नसावे.
हा सूर्य हा जयद्रथ… ३) हरमीत सिंग

हरमीत सिंग हा गुरु नानक देव विश्वविद्यालयाचा डॉक्टरेटचा विद्यार्थी असल्यामुळे ‘हॅपी पीएचडी’ या नावानेही ओळखला जाणारा खलिस्तानी आतंकवादी होता. तो बंदी घातलेल्या खलिस्तान लिबरेशन फोर्स (KLF) या संघटनेचा प्रमुख होता. भारतातील हिंदू नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांच्या लक्ष करून केलेल्या (targeted) हत्यांमागील तो सूत्रधार होता. त्याच्यावर अमृतसरजवळील निरंकारी भवनवरील ग्रेनेड हल्ला आणि अमली पदार्थांच्या तस्करीचाही आरोप होता. भारताच्या १५ मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत त्याचा समावेश करण्यात आला होता आणि इंटरपोलने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. त्यामुळे इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानने त्याला आसरा दिला होता. २७ जानेवारी २०२० रोजी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमधील लाहोर शहरातील डेरा चहल गुरुद्वाराजवळ गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली.
हरमीत सिंगची हत्या का झाली याबद्दल अनेक प्रवाद आहेत. अनैतिक संबंध, पैशाची देवाणघेवाण याचबरोबर RAW (रॉ) किंवा ISI ने त्याची हत्या केली असे देखील मानले जाते.
सत्य घटनेला साजेसशीच हरमीत सिंगची हत्या चित्रपटात दाखवली आहे. आपल्याकडच्या भिकारड्या मानसिकतेच्या टीकाकारांना यात नेमके काय जाचते आहे? हरमीत सिंगचे “अज्ञात मारेकरी” (उर्दू त्यांना नामालूम अफराद… نامعلوم افراد म्हणतात) ISI चे एजंट असलेले चालतील पण RAW चे सहन होत नाहीत असे आहे का? असे असेल तर तुम्ही जळून जळून खाक व्हा. आमची काहीच हरकत नाही.
तेथे कर माझे जुळती… अज्ञात वीर
इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमध्ये नामालूम अफराद अर्थात अज्ञात मारेकर्यांनी आजपर्यंत भारताला हवे असलेले जितके मोस्ट वॉन्टेड अतिरेकी टिपले आहेत त्यांचा इतिहास सांगायचा म्हटला तर एक अखंड मालिका चालवावी लागेल. ते सगळेच चित्रपटात दाखवणे शक्य नव्हते. वानगीदाखल नामालूम अफरादनी टिपलेले काही अतिरेकी आम्ही या नीच मानसिकतेच्या टीकाकारांना दाखवून देऊ इच्छितो.
हा सूर्य हा जयद्रथ… ४) शाहिद लतीफ

हा आहे पठाणकोट एअरबेस हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि ”जैश-ए-मोहम्मद’ (JeM) या प्रतिबंधित संघटनेचा वरिष्ठ कमांडर शाहिद लतीफ. २ जानेवारी २०१६ रोजी पंजाबमधील पठाणकोट एअरबेसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार. त्यानेच सियालकोटमधून ४ दहशतवाद्यांना भारतात पाठवले होते आणि हल्ल्याचा समन्वय साधला होता. शाहिद लतीफला १९९४ मध्ये भारतात अटक करण्यात आली होती. तो १६ वर्षे भारतातील तुरुंगात होता आणि २०१० मध्ये त्याची शिक्षा पूर्ण झाल्यावर त्याला वाघा बॉर्डरमार्गे पाकिस्तानला हद्दपार करण्यात आले होते.
१९९९ मधील इंडियन एअरलाईन्सच्या विमान (IC-814) अपहरणाच्या प्रकरणातही तो आरोपी होता. ११ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या सियालकोट जिल्ह्यातील एका मशिदीत “अज्ञात बंदूकधाऱ्यां”नी त्याची गोळ्या झाडून हत्या केली.
धुरंधर २ चित्रपटात मशिदीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेला हा प्रसंग किती सत्य घटनेवर आधारित आहे हे आपल्या लक्षात येते. यात अवास्तव, आक्षेप घेण्यासारखे, टीका करण्यासारखे काय आहे? कदाचित नामालूम अफरादांनी मशिदीत गोळ्या झाडल्यामुळे आमच्याकडेच्या सूडोसेक्युलऱ्यांची प्रचंड घालमेल झाली असावी.
वर दिलेली ४ उदाहरणे ही वस्तुस्थितीची खात्री पटावी म्हणून दिलेली वानगी दाखल आहेत. चित्रपटात अज्ञात मारेकरी अर्थात नामालूम अफरादांनी भारताला हव्या असलेल्या अनेक मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांना टिपून टिपून मारल्याचे दाखवले आहे आणि त्या प्रत्येक घटनेला सत्याचा मजबूत आधार आहे.
इतक्या हत्या होऊनही या अज्ञात मारेकरी अर्थात नामालूम अफराद (نامعلوم افراد) पैकी एकही मारेकरी पकडला जाऊ नये हे इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या सरकारचे, लष्कराचे, ISI चे दुःख आहे आणि योगायोग असा की, बहुदा तेच आमच्याकडच्या तमाम पुरोगामी लिब्रांडू डावे सेक्युलर आणि इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानी प्रेमी मंडळींचे देखील दुःख आहे. यह रिश्ता क्या कहलाता है?
हा सूर्य हा जयद्रथ… ५) अतिफ अहमद म्हणजेच अतिक अहमद

अतिक अहमदचे उदाहरण तर भारतातील आहे. उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाने पोसलेला माफिया. समाजवादी पक्षातर्फे खासदार आणि आमदार देखील निवडून गेला होता. त्याच्यावर १६० पेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले होते. पण त्याला हात लावण्याची कोणत्याही सरकारची बिशाद नव्हती.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुल्लायम सिंग यादव त्याच्या कुत्र्याबरोबर हस्तांदोलन करतानाचा फोटो आणि बातमी त्यावेळी खूप गाजली होती. जर एखादा मुख्यमंत्री आपल्या नेत्याच्या कुत्र्याबरोबर हस्तांदोलन करत असेल तर तो नेता माफिया व्हायला कितीसा वेळ लागणार? आणि आता त्याच मुल्लायम सिंग यादव यांचे उत्तराधिकारी पुत्र आणि समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांचा चित्रपटात दाखवलेल्या अतिक अहमदच्या ISI शी असलेल्या संबंधांवरून थयथयाट चालला आहे. तर मग अखिलेश यादव यांनी एका प्रश्नाचे उत्तर द्यावे. मरते वेळी अतिक अहमदकडे हजारो कोटींची संपत्ती होती. ती कुठून आली? अखिलेश यादव यांना याचे उत्तर माहित आहे पण ते कधीच देणार नाहीत.
मात्र त्याचे नेमके उत्तर धुरंधर २ मध्ये दिले आहे. खोट्या चलनी नोटा (Fake Currency), ISI चा वरदहस्त डोक्यावर असलेला खोट्या नोटांच्या सूत्रधार जावेद खनानी. बडे साहब अर्थात दाऊद इब्राहिम. दुबई नेपाळ मार्गे उत्तर प्रदेशात अतिक अहमद यांची साखळी चित्रपटात अचूक व उत्कृष्टपणे दाखवली आहे. अखिलेश यादव यांना नेमके हेच सहन होत नसावे.

आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “नोटबंदी” करून त्या खोट्या नोटांचा केलेला कोळसा. त्यानंतर लगेच इस्लामी रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमधील खोट्या नोटांच्या सूत्रधार जावेद खनानीची संशयास्पद आत्महत्या. (त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यामुळे ती आत्महत्या होती की हत्या हे गुपित शेवटपर्यंत गुलदस्त्यातच राहिले) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घातलेला घाव इतका वर्मावर बसला की, या लिब्रांडू गँगचे विव्हळणे अजूनही चालू आहे. आणि अतिक अहमदची पोलिसांच्या ताब्यात असताना टीव्ही कॅमेरासमोर डोक्यात गोळ्या घालून झालेली हत्या. हा तर सगळा आपल्या डोळ्यासमोर घडलेला खरा इतिहास आहे ना रे बिनबुडाच्या लोट्यांनो? आणि हेच तर सगळं चित्रपटात दाखवलं आहे. मग यात अविश्वसनीय, अतिशयोक्तीपूर्ण किंवा अतार्किक असे काय आहे?

उलट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उर्फ बुलडोझर बाबा यांनी विधानसभेत अखिलेश यादव यांच्या समोरच पोलीस कस्टडीत असलेल्या अतिक अहमदला सज्जड दम देताना “इन माफियाओं को मिट्टी में मिला देंगे” म्हणून जो डोस पाजला होता. तो रोमांचक प्रसंग न दाखवल्याबद्दल निर्माता आणि दिग्दर्शक आदित्य धर यांचे सदर बदमाश गॅंगने आभारच मानले पाहिजेत. नाहीतर यांचा जळून कोळसा झाला असता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा “नोटबंदी”सारखा टीव्ही चॅनेल समोर उभे राहून जाहीर केलेल्या धाडसी निर्णयाला तुम्ही प्रोपागंडा म्हणत असाल तर चित्रपटात “प्रोपागंडा” म्हणजे नेमके काय असते ते आम्ही तुम्हाला सांगतो.
विळा हातोडा… हीच काय ती तुमची कलात्मकता…

अमिताभ बच्चनचा कुली चित्रपट आठवला? लाल डगला घालून अमिताभ बच्चन हातात विळा हातोडा घेऊन एका उद्योगपतीशी संघर्ष करताना दाखवला आहे.

विळा हातोडा ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची निशाणी आहे. ती चित्रपटात अमिताभ बच्चनच्या हातात दाखवणे ही कलात्मकता असते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रत्यक्ष भाषण चित्रपटात दाखवणे हा मात्र प्रोपागंडा असतो… वा रे वा…

दोन्ही धुरंधर चित्रपटांमुळे सुखावलेले हिंदू जनमानस आता मोठ्या अपेक्षेने धुरंधर ३ यावा यासाठी निर्माता दिग्दर्शक आदित्य धर याला साकडे घालत आहे. आणि १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटांनंतर “बड़े साहब” अर्थात दाऊद इब्राहिमला भारताबाहेर पळून जाण्यास मदत करणारा “बहुत बड़ा साहब” कोण आहे ते आदित्य धर दाखवतात काय याची आतुरतेने वाट पाहत आहे.