Saturday, July 27, 2024

रोहित पवारांचा रडीचा डाव; अजित पवारांकडून मिमिक्री

Share

Baramati lok sabha : लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) जाहीर झाल्यापासून संपूर्ण राज्याचं लक्षबारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागले आहे. प्रथमच बारामती मतदारसंघात (Baramati lok sabha) पवार विरुद्ध पवार अशी निवडणूक होत आहे. महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटातून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बारामती येथील सांगता सभेत आमदार रोहित पवार (Rohit Pawar) भावूक झालेले पाहायला मिळाले. यानंतर अजित पवारांनी (Ajit Pawar) रोहित पवारांची मिमिक्री करत हा रडीचा डाव असल्याचे म्हटले.

रोहित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांची मिमिक्री करत खिल्ली उडवली. रोहित पवारांची नक्कल करत अजित पवार म्हणाले, ‘मी सांगितल्याप्रमाणे शेवटच्या सभेत भावनिक करण्याचा प्रयत्न केला गेला. आमच्या एका पठ्ठ्याने तर डोळ्यातून पाणी काढले. मी पण पाणी काढूनदाखवतो मला मतदान द्या. असली नौटंकी बारामतीकर अजिबात खपवून घेणार नाहीत. हा रडीचा डाव झाला. तुम्ही कामाच्या जोरावार मते मागा, आपले खणखणीत नाणे दाखवा’, असं जोरदार प्रत्युत्तर आजी पवारांनी दिले.

‘पक्ष फुटला त्यावेळी मी आणि काही पदाधिकारी शरद पवार यांच्याबरोबर बसलो होते, त्यांच्याशी चर्चा करत होतो. ते टीव्हीकडे बघत होते. चेहऱ्यांवरचं दुख: ते दाखवत नव्हते. आम्ही त्यांना काही प्रश्न केले, त्यांनी आमच्या प्रश्नांची उत्तरेही दिली. त्यानंतर ते खोलीच्या बाहेर जायला निघाले, त्यापूर्वी त्यांनी आम्हाला सांगितले, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपल्याला स्वाभिमानी महाराष्ट्र घडवायचा आहे. तो घडवत असताना आपल्याला नवीन पिढी तयार करायची आहे, जोपर्यंत ती नवी पिढी तयार होत नाही, तोपर्यंत मी माझे डोळे मिटणार नाही”, हा प्रसंग सांगताना रोहित पवार यांच्या डोळ्यात अश्रू आले.

अन्य लेख

संबंधित लेख