Friday, November 8, 2024

“हिंदू राष्ट्राच्या निर्मिती साठी बलशाली आणि चरित्रवान समाज निर्माण करणे गरजेचे आहे…”

Share


पुणे दि. 06 ऑक्टोबर 2024 : असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वसंसेवक संघाचे श्री.आनंद कुलकर्णी, (पुणे महानगर बौद्धिक प्रमुख, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुणे महानगरातील कात्रज भागातील धनकवडी नगराच्या वतीने आयोजित केलेल्या विजयादशमी शस्त्रपुजन उत्सवात केले. या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून श्री गणेशजी ढालपे (प्रसिध्द शिवव्याख्याते), प्रजापीता ब्रह्मकुमारी सुलभा दीदी (ब्रम्हकुमारी धनकवडी केंद्र प्रमुख) तसेच नगर कार्यवाह श्री.बाळासाहेब बोत्रे उपस्थित होते.
श्री. आनंद कुलकर्णी पुढे म्हणाले की, आपल्या परंपरेत विजयादशमी उपासनेचा दिवस आहे, असुरी शक्ती वरती विजयाचा दिवस आहे. नवरात्रात नऊ दिवस शक्तीची उपासना केली जाते. आसुरी शक्ती वर विजय मिळवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सज्जन शक्तींना एकत्र करून दुर्जनां विरुद्ध लढा दिला. पूजनीय डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांनी विजयादशमीच्या दिवशी संघाची स्थापना केली. संघ या वर्षी 100 वर्षाचा होत आहे, या 100 वर्षात संघ सर्व व्यापी व सर्व स्पर्शी झाला आहे. व्यक्ती निर्माणाचे कार्य संघ अविरत करत आहे. त्या सोबत बलशाली व अजेय राष्ट्र निर्मिती करता शक्तीयुक्त आणि चरित्रवान व्यक्ती निर्माणाचे कार्य संघ मागील शतक भरा पासून करत आहे. पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर यांचे हे 300 वी जयंती वर्ष आहे. पूजनीय अहिल्या देवीनी इस्लामिक आक्रमकांनी ध्वस्त केलेल्या मंदिराची पुनर्बंधणी त्यांनी केले, सोबत ध्वस्त झालेला हिंदू समाज सुद्धा त्यांनी जागृत केला. मागील काही वर्षा पासून भारत अखंड राष्ट्र नाही हा खोटा विमर्श काही शक्ती द्वारे प्रस्तापित करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. मात्र संघ भेदा-भेद न मानता सर्व हिंदूंचे संघटन करत आहे. जाती पंथ प्रांत भाषा भेद संघ मानत नाही व हेच उत्तर या राष्ट्र विघटित शक्तींना आहे. पूजनीय डॉ हेडगेवार यांचं स्वप्न निर्माण करण्याचे कार्य आपण करत आहोत. हिंदू समाजाचे संघटन करण्याचे काम संघ करत आहे. राम मंदिरा करिता चा लढा व नंतर राम मंदिर उभारणी पासून आणीबाणी च्या काळात लढा देण्याचे काम संघ स्वयंसेवकांनी केले. आज अनेक सेवा कार्य संघ स्वयंसेवक करत आहेत. सक्ती आणि अमिषाने होणारे धर्मांतरण रोखण्याचे काम धर्मजागरण तर्फे केले जाते, अनेक सक्तीने झालेली धर्मांतरे या द्वारे रोखली गेली. पर्यावरण रक्षणाची जवाबदारी संघ स्वयंसेवकांनी घेतली आहे व त्याद्वारे पर्यावरणाची होणारी हानी थांबविण्याचे काम संघ करत आहे. एकत्र कुटुंब पद्धतीने टिकावी या करता कुटुंब प्रबोधनाचे काम संघ करत आहे. संविधानाने दिलेल्या कर्तव्याची जाणीव समाजात निर्माण होण्यासाठी संघ प्रयत्न करत असतो.

या कार्यक्रमास धनकवडी नगरातील सर्व वयोगटातील स्वयंसेवक, नागरिक माता- भगिनींची उपस्थिती होती. एकूण उपस्थित 375 (स्वयंसेवक + नागरिक ) होते. शस्त्र पुजन कार्यक्रमाच्या सुरवातीला ध्वजाला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर उपस्थित स्वयंसेवकांनी प्रत्युत प्रचलनम्, व्यायाम योग, दंड योग, बाल शाखेचे प्रात्यक्षिक व खेळाचे सादरीकरण सोबत व्यावसायिक शाखेने योगासनाच, विजेरी योग आदी प्रात्याक्षिके सादर केली.

अन्य लेख

संबंधित लेख