Wednesday, January 15, 2025

प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Share

छत्रपती संभाजीनगर : “बाबासाहेबांच्या संविधानाचा आदर वाढावा, त्याद्वारे सामाजिक न्यायाची भावना अधिक दृढ व्हावी, यासाठी प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) केली. छत्रपती संभाजीनगर येथील टीव्ही सेंटर चौकात ‘मुख्यमंत्री कृतज्ञता सोहळा’ आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कि, येत्या चार दिवसांनी आपण देशाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करणार आहोत. बाबासाहेबांनी लिहिलेली राज्यघटना होती म्हणूनच आपण एक प्रजासत्ताक, सार्वभौम राष्ट्र म्हणून जगभर ओळखले जाऊ लागलो. ‘जब तक सुरज चांद रहेगा, बाबासाहेबका संविधान रहेगा’, बाबासाहेबांच्या संविधानाचा आदर वाढावा, त्याद्वारे सामाजिक न्यायाची भावना अधिक दृढ व्हावी, यासाठी प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे केली. तसेच शहराचा डीपी प्लॅन हा सर्वांच्या हिताचा असेल तोच करु अशी ग्वाही त्यांनी शहरवासियांना दिली.

अन्य लेख

संबंधित लेख