Thursday, October 10, 2024

संजय राऊतांचा राजीनामा घेणार का? आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना सवाल

Share

मुंबई : उद्धवजी संजय राऊतांचा राजीनामा घेणार आहेत का? असा सवाल भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) केला आहे. संजय राऊतांना (Sanjay Raut) मेधा सोमय्या (Medha Somaiya) यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी ठरवण्यात आले आहे. यावर आशिष शेलारांनी माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली आहे.

आशिष शेलार म्हणाले की, “संजय राऊतांनी स्वतः राजीनामा द्यायला हवा. उद्धवजी संजय राऊतांचा राजीनामा घेणार आहेत का? हा माझा सवाल आहे. रश्मीताई ठाकरे या सामना वृत्तपत्राच्या प्रमुख आहेत. त्या संजय राऊतांना डच्चू देतील ही माझी अपेक्षा आहे. न्यायालयाने एका महिलेची बदनामी केल्याप्रकरणी संजय राऊतांना दोषी ठरवत शिक्षा दिली आहे. त्यामुळे महिलांची बदनामी करणारे व्यक्ती संपादकपदी बसू शकतात का? ते राज्यसभेचे नेतृत्व करू शकतात का? याचं उत्तर उबाठा सेनेने द्यावं. महिला सुरक्षा आणि महिलांची बदनामी ह्या विषयांवर जर उबाठा सेना संवेदनशील असेल तर संजय राऊतांचा राजीमाना घेईल,” असे ते म्हणाले.

अन्य लेख

संबंधित लेख