Sunday, November 3, 2024

शिवसेना आमदार संजय शिरसाट यांच्या कारवर अज्ञातांकडून दगडफेक

Share

संभाजीनगर : शिवसेनेनेच आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsaat) यांच्या कारवर अज्ञात व्यक्तीने दगड फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महत्त्वाचे म्हणजे संजय शिरसाट कुटुंबीय सोबत असतांना गाडीवर दगड फेकल्याचा प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगरच्या बाबा पेट्रोल पंपाजवळील महावीर चौकात रविवारी रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ज्यावेळी दगड मारला तेव्हा शिरसाट यांच्या पत्नी, कन्या आणि मुलगा गाडीतच होता. रस्त्यावर भांडण सुरू असल्याने शिरसाट कुटुंबीयांनी गाडी थांबवली होती. यावेळी शिरसाट यांच्या गाडीवर दगड फेकल्याची घटना घडली. या घटनेनंतर तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच, मोठ्या प्रमाणात शिवसैनिक देखील जमा झाले होते. भांडणावेळी चुकून शिरसाट यांच्या गाडीवर कुणी दगड फेकला की, हा नियोजित कट होता, याचा तपास सुरू आहे.

अन्य लेख

संबंधित लेख