Wednesday, December 4, 2024

विरोधक फक्त रडत बसतात; शिंदे गटाचा संजय राऊतांवर जोरदार पलटवार

Share

महाराष्ट्र : “शिंदेंना केंद्रीय गृहमंत्रीपद आणि पंतप्रधानपदाचं आश्वासन दिलं असेल, महाराष्ट्रात भाजपचाच मुख्यमंत्री बनेल याची शंका नाही,” असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले होते. त्यावर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “कोणाला पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री बनवायचं, हा आमचा विषय आहे. विरोधकांकडे फक्त रडत बसण्याशिवाय दुसरं काही काम उरलेलं नाही,” असा पलटवार करत त्यांनी विरोधकांना चिमटा काढला.

शिरसाट पुढे म्हणाले, “कसं झालं, क्या से क्या हो गया असे डायलॉग विरोधक आता पाठ करत बसतील. करावं तसं भरावं हे विरोधकांच्या वाट्याला आलंय. आधी बेकायदेशीर सरकार बनवत होते आणि आता कायदेशीर सरकार कधी स्थापन होईल याची त्यांनाच जास्त चिंता लागली आहे. आम्हाला आमचं सरकार कधी स्थापन करायचं, ते कसं चालवायचं, हे आम्ही ठरवू. विरोधकांनी आता फक्त घोषणा देण्याचं काम करावं,” असा खोचक सल्लाही शिरसाट यांनी दिला.”

अन्य लेख

संबंधित लेख