Tuesday, September 17, 2024

सातारा रोड येथे झाले डॉ.उदय निरगुडकर यांचे व्याख्यान…

Share

दिनांक 4 सप्टेंबर रोजी कोरेगाव तालुक्यामध्ये सातारा रोड या ठिकाणी जेष्ठ पत्रकार व विचारवंत डॉ.उदय निरगुडकर यांचे विमर्श या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. या व्याख्यानामध्ये डॉ.उदय निरगुडकर यांनी चुकीचे विमर्श पसरवून मतदारांची कश्या प्रकारे फसवणूक केली जाते याची मांडणी केली. त्याचबरोबर विमर्ष काय आहे? तो कसा पसरतो? त्याचा तोटा कसा होतो या संदर्भात त्यांनी उपस्थितांना माहिती दिली. लोकसभा निवडणुकीमध्ये कशाप्रकारे विविध वीमर्श पसरवले व त्याची काही उदाहरणे त्यांनी दिली. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवरची उदाहरणे देऊन निरगुडकरांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली.

समाज एकवटला की क्रांति होत असते, त्यामुळे समाजाने योग्य विचार करावा, कृतीचा परिणाम काय होत असतो याचा विचार करावा. आपल्या कृतीमुळे पुढच्या पिढ्यांचं भलं होईल की वाईट होईल याचा विचार करावा असे मार्गदर्शन डॉ.उदय निरगुडकर यांनी केले. हा कार्यक्रम प्रिया शिंदे यांनी आयोजित केला होता. यावेळी कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे, प्रिया शिंदे व 200 पेक्षा जास्त कार्यकर्ते उपस्थित होते.

अन्य लेख

संबंधित लेख