Friday, September 20, 2024

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना

Share

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना बाल संगोपन योजना ही २००५ मध्ये केंद्र शासन व राज्य शासन अंतर्गत सुरु करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे. परंतु ही ही योजना केंद्र शासनाच्या अंतर्गत जरी चालवली जात असली तरी संपूर्ण योजना पूर्णपणे महाराष्ट्राज्याच्या निधीतून राबवली जाते, व फक्त महाराष्ट्रतील लाभार्थीच या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ही योजना महिला व बालविकास विभागाच्या वतीने राबविली जाते.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला लाभार्थी बालकाला रुपये 2250 आर्थिक मदत केली जाते वही मदत थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होते आधी या अनुदानाची रक्कम 1100 रुपये प्रतिमा होती पण या रकमेत महायुतीच्या सरकारने वाढ करून ती 2250 रुपये प्रतिमा अशी करण्यात आली आहे.
या सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेतर्गत या पात्र मुलांना 2250 रु. दर महिन्याला मिळतात असे एका वर्षाला 27000 रु. मिळतात. हे पैसे वय 18 पूर्ण होई पर्यत दर महिन्याला मिळत जातात.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेचा लाभ कोणकोणते बालक घेऊ शकतात ते आता आपण बघुयात

निराधार व गरजू बालक ज्या मुलांना आई किंवा वडील नसतील असे मुल, ज्या मुलांना आई व वडील दोन्ही नसतील असे मुल, कोविड कालावधीत पालक गमावलेले मुल जे परिवार आपल्या मुलांना सांभाळण्यासाठी असमथे असतील ते बालके, मतिमंद मुले, अपंग मुले, दोन्ही पालक अपंग आहेत असे मुल , एच आय व्हि ग्रस्त पालकांचे मुले, ज्या मुलांचे आई वडील गंभीर आजाराने रुग्णालयात भर्ती असतील ती मुले, ज्या वालकांचे पालक मानसिक रुग्ण आहेत ते बालके , ज्यांचे आई वडील घटस्फोटीत आहेत ती बालके, ज्या मुलाच्या पालकाना पत्ता लागत नाही अशी बालके जे दतक देणे शक्य होत नाही अशी बालके , ज्या वालकांना कुष्ठरोग झाला आहे असे बालके इल्यादी प्रकारे मुले या योजनेचा लाभ घेऊ शकतात .

या योजनेचा लाभ घेण्यासाठीची पात्रता


1) लाभार्थी महाराष्ट्रचा रहिवाशी असावा
2) लाभार्थ्याचे वय 0 ते 18 वर्ष दरम्यान असावे.
3) अर्जदार या योजनेच्या निकषात बसला- पाहिजे.
4)एका कुटुंबातील दोन किंवा जास्त मुलांनाही या योजनेचा लाभ दिला
जातो.


क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय-काय कागदपत्रे आवश्यक आहेत

1)या योजनेसाठी करावयाचा अर्जाचा नमुना ( कुठल्याही झेरॉक्स च्या दुकानात मिळून जाईल)

2)या मुलांचे शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट ‘ जन्म दाखला

3)आधार कार्ड झेरॉक्स परत ( पालकांचे व पालकांचे ।

4)तलाठी याचा उत्पन्नाचा दाखला
पालकांचे मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र (आई किंवा वडील मूल्य दाखला )

5)पालकांचा रहिवाशी दाखला ( ग्रामपंचायत / नगरपालिका यांचा ।

6)मुलाचे बॅक पासबुक झेरॉक्स

7)मुत्युचा अहवाल ( पालकांना मृत्यू कशामुळे झाला ते उदा . कोविड ने झाला असेल तर मूल्यू अहवाल )

8)रेशनकाडे

9)झेरॉक्स प्रत

10)राहत्या घरा समोर पालका सोवत बालकाचा फोटो ( 4.6 फोटो प्रत्येक मुलासोबत वेग वेगळा फोटो लागेल )

11) मुलांचे पासपोर्ट फोटो दोन

12)पालकांचे पासपोर्ट फोटो

सदर योजनेचा अर्ज भरून झाल्यावर हे सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत हा अर्ज मंजूर करण्यासठी जिल्ह्याच्या ठिकाणी असणारी बाल कल्याण समिती कडे सादर केला जातो व ती समिती अर्ज मंजूर करते.

तसेच बाल संगोपन योजनेची माहिती साठी व फॉर्म जमा करण्यासाठी तालुका पंचायत समिती ऑफिस मध्ये बाल संरक्षण अधिकारी यांना भेटावे किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय या ठिकाणी भेटावे .

अशाच नवनवीन माहितीसाठी NB मराठी ला नक्की फॉलो करा

अन्य लेख

संबंधित लेख