Sunday, September 8, 2024

खा.शाहु महाराज छत्रपतींनी राजकीय पांघरून घेतलेय – प्रविण दरेकर

Share

मुंबई : जिल्हा प्रशासनाने अतिक्रमणविरोधी कारवाई केल्याने विशाळगड (Vishalgad) आणि आजूबाजूच्या परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, छत्रपती शाहू महाराज आणि सतेज पाटील यांनी याठिकाणची पाहणी केली. यावरून भाजपाचे (BJP) नेते आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी छत्रपती शाहू महाराजांवर निशाणा साधला आहे.

ते म्हणाले कि, “खा.शाहु महाराज छत्रपती यांना किंवा काँग्रेसला निवडणुकीत एका विशिष्ट समाजाने मतदान केले आहे. त्या समाजाशी इमानदार राहण्याचा ते प्रयत्न करताहेत हे स्पष्ट दिसतेय. एका बाजूला आपण छत्रपतींचा वारसा सांगतो आणि दुसऱ्या बाजूला आपल्या गडकिल्ल्यांवर अतिक्रमण होत असेल तर त्याचे आपण संरक्षण करायला जातो हे दुर्दैव आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीराजेंनी घेतलेली भुमिका योग्य आहे. गडकिल्ल्यांवर अतिक्रमण होताच कामा नये. त्याचे समर्थन कुणीच करू शकत नाही. परंतु आता छत्रपती शाहू महाराज राजकीय झालेत. सतेज पाटील यांच्या बरोबरीने ते राजकीय उद्देशाने भुमिका घेताना दिसताहेत हे दुर्दैवी असल्याचं दरेकर म्हणाले

तसेच, “संभाजी महाराजांनी जी भूमिका घेतलीये त्या भूमिकेशी सरकारही सहमत आहे. ज्या वेळेला प्रतापगडावर अतिक्रमण होत त्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेबांनी बुलडोजर लावला ते अतिक्रमण निष्कासित केलं. त्यामुळे, गडकिल्ले हे सुरक्षित पाहिजेत. ऐतिहासिक वारसा जपला पाहिजे हि भूमिका सार्वत्रिक महाराष्ट्राची आहे, तीच भमिका सरकारची आहे. शाहू महाराज यांनी राजकीय पांघरून घातलेले आहे. त्याच्यामुळे अश्याप्रकारची भूमिका त्यांची येतांना दिसते” असं प्रविण दरेकर म्हणाले.

अन्य लेख

संबंधित लेख