मुंबई : निवडणूकीनंतर संख्याबळानुसार मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवला जाईल, अशी भूमिका शरद पवारांनी (Sharad Pawar) घेतली आहे. यावरून आता भाजपा आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ““शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लायकी दाखवली. उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपदाच दुकान कायमस्वरुपी बंद झालय. उद्धव ठाकरेंनी दिल्लीला जाऊन मुजरा केला, त्याचा काहीही उपयोग झाला नाही” अशी खोचक टीका नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे वर केली.
नितेश राणे म्हणाले की, “शरद पवारांनी उद्धव ठाकरेंची लायकी दाखवून दिली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी आता फक्त मुजरा करून यायचे बाकी राहिलेत. बाकी सगळं करून ते आलेत. आतासुद्धा शरद पवारांसारख्या जेष्ठ नेत्यानेच जर अशी भूमिका घेतली असेल तर मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंचं दुकान कायमचं बंद झालेलं आहे,” अशी टीका त्यांनी केली.
- कल्याण-डोंबिवलीत ‘बीकेसी’सारखे बिझनेस हब आणि एसी लोकलचा प्रवास – सीएम देवेंद्र फडणवीस
- ६.७१ कोटी प्रवासी, १०७ कोटी महसूल: पुणे मेट्रोची २०२५ मध्ये दमदार कामगिरी
- मविआसाठी अस्लम शेख हेच मुंबईचे ‘झोरान ममदानी’?
- वैचारिक शरणागती ते राजकीय अध:पतन: ‘करून दाखवलं’चा पंचनामा
- पागडी इमारतींसाठी नवे धोरण: मुंबईच्या जुन्या प्रश्नावर ठोस पाऊल