मुंबई : निवडणूकीनंतर संख्याबळानुसार मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवला जाईल, अशी भूमिका शरद पवारांनी (Sharad Pawar) घेतली आहे. यावरून आता भाजपा आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ““शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लायकी दाखवली. उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपदाच दुकान कायमस्वरुपी बंद झालय. उद्धव ठाकरेंनी दिल्लीला जाऊन मुजरा केला, त्याचा काहीही उपयोग झाला नाही” अशी खोचक टीका नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे वर केली.
नितेश राणे म्हणाले की, “शरद पवारांनी उद्धव ठाकरेंची लायकी दाखवून दिली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी आता फक्त मुजरा करून यायचे बाकी राहिलेत. बाकी सगळं करून ते आलेत. आतासुद्धा शरद पवारांसारख्या जेष्ठ नेत्यानेच जर अशी भूमिका घेतली असेल तर मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंचं दुकान कायमचं बंद झालेलं आहे,” अशी टीका त्यांनी केली.
- लोकायन २०२६ – समुद्राच्या लाटांवर भारताच्या नौदलाचा मैत्रीचा संदेश!
- वायुदलातील महिला ‘शक्ती’चे प्रेरणास्थान – एअर व्हाईस मार्शल शक्ती शर्मा
- भारताचा पहिला Imaging satellite: ४ सप्टेंबरला GSLV-F17/EOS-05 चे प्रक्षेपण
- ‘मराठवाडा मुक्ती संग्राम दिना’चे औचित्य साधून १७ सप्टेंबरपासून बीड-पुणे रेल्वे सेवा!
- ताट बदललं, तर वजनाचा काटाही बदलेल!